Nargis Fakhri Tony Beig Secret Wedding : बॉलीवूड अभिनेत्री नर्गिस फाखरीने तिचा प्रियकर टोनी बेगबरोबर कॅलिफोर्नियामध्ये गुपचूप लग्न केल्याची माहिती समोर येत आहे. अलीकडेच तिला मुंबईतील एका कार्यक्रमात पाहिले गेले. या कार्यक्रमात पती टोनीबरोबर तिची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
अलीकडेच जेव्हा अभिनेत्री मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये एका कार्यक्रमासाठी पोहोचली तेव्हा फराह खानने तिच्या लग्नाचे गुपित उघड केले. तिचा पती टोनी बेगबरोबर रेड कार्पेटवर येण्याची तिची ही पहिलीच वेळ होती. तेव्हापासून या जोडप्याच्या फोटोंबद्दल आणि त्यांच्या लग्नाबद्दल सर्वत्र चर्चा सुरू आहे.
खरंतर, पापाराझींसमोर फराहने टोनीला तुझ्या पत्नीच्या बाजूला उभा राहा असे सांगितले आणि मग सर्वांचे लक्ष फराहच्या विधानावर गेले. आता सर्वांना नर्गिसच्या लग्नाबद्दल जाणून घ्यायचे आहे. परंतु, अभिनेत्रीने अद्याप काहीही अधिकृत केलेले नाही. टोनीबरोबर तिची जोडी आता खूप पसंत केली जात आहे.
झाले असे की, फराह पापाराझींसमोर पोज देत होती. नर्गिसही तिथे आली आणि तिच्याबरोबर उभी राहिली आणि मग मागून टोनीही आला. त्याला पाहून फराहने नर्गिसकडे बोट दाखवले आणि म्हणाली की, तू तुझ्या पत्नीबरोबर उभा राहा. हे ऐकून अभिनेत्री हसली. वयाच्या ४५ व्या वर्षी लग्न करणारी नर्गिस तिच्या पतीबरोबर पहिल्यांदाच दिसल्यामुळे सर्वत्र चर्चेत आहे.
नर्गिसने या वर्षी फेब्रुवारीमध्ये तिचा प्रियकर आणि अमेरिकन उद्योगपती टोनीशी लग्न केल्याचे वृत्त आहे. लग्न करण्यापूर्वी दोघांनी सुमारे तीन वर्षे एकमेकांना डेट केले. त्यांनी दुबईमध्ये नवीन वर्ष २०२४ एकत्र साजरे केले, जिथे नर्गिसचा एक्स बॉयफ्रेंड उदय चोप्रा देखील उपस्थित होता.
टाईम्स ऑफ इंडियामधील एका वृत्तानुसार, कॅलिफोर्नियातील एका आलिशान हॉटेलमध्ये खाजगी समारंभात या जोडप्याने लग्न केले. नर्गिस आणि टोनी दोघांनीही त्यांच्या लग्नात फोटो न घेण्याची पॉलिसी लागू केली होती. त्यांच्या लग्नात जवळचे कुटुंबीय आणि मित्र उपस्थित होते.
नर्गिस अलीकडेच साजिद नाडियाडवाला यांच्या निर्मित ‘हाऊसफुल ५’ मध्ये दिसली होती. २५० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर २८८.५८ कोटी रुपयांची कमाई केली.