अभिनेते नसीरुद्दीन शाहा हे स्पष्टवक्तेपणामुळे अनेकदा चर्चेत असतात. कसलीही तमा न बाळगता रोखठोक वक्तव्य केल्यामुळे अनेकदा नसीरुद्दीन शाहा यांना विरोधही पत्करावा लागला आहे. मात्र आता पुन्हा एकदा नसीरुद्दीन शाहा यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. भारतीय फिल्म इंडस्ट्री ही इस्लामोफोबियाने ग्रासलेली आहे असं म्हणत त्यांनी सरकारवरदेखील निशाणा साधला आहे. सरकारकडून अनेक फिल्म मेकर्सना असे सिनेमा बनवण्यासाठी प्रोस्ताहन दिल जातं असल्याचं ते म्हणाले आहेत.

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत नसीरुद्दीन शाहा म्हणाले, “तुम्ही जेवढे जास्त पैसे कमवता तेवढा इथे तुमचा जास्त आदर केला जातो. आजही इंडस्ट्रीमध्ये तीन खान टॉपला आहेत. त्याना आव्हान देऊ शकत नाही आणि आजची ते रिजल्ट देत आहेत. मी कधीही भेदभावाचा समना केला नाही. मला तर करिअरच्या सुरुवातीलाच नाव बदण्याचा सल्ला देण्यात आला होता मात्र मी माझं नाव बदललं नाही.” असं नसीरुद्दीन शहा म्हणाले.

सरकारच्या कामगिरिचा प्रचार करणारे सिनेमा

या मुलाखतीत नसीरुद्दीन शहा म्हणाले, “फिल्म इंडस्ट्रीला आता सरकारकडून त्यांच्या विचारांचं समर्थन करणारे सिनेमा बनवण्यासाठी प्रोस्ताहित केलं जातं. सरकराच्या कामगिरीचं कौतुक करणारे सिनेमा बनवले जातात. त्यांना फडिंग देखील केलं जातं. तसचं जर ते थेट प्रचार करणारे सिनेमा असतील तर त्यांना क्लीन चीट देण्याचं आश्वासनही सरकारकडून दिलं जातं.” असा खुलासा नसीरुद्दीन शहा यांनी केला.

या कामाची तुलना नसूरुद्दीन शाह यांनी नाझी जर्मनीसोबत केली. ते म्हणाले, “नाझी जर्मनीमध्ये असं होत होतं. उत्तम सिनेनिर्मिती करणाऱ्या फिल्म मेकर्सना नाझी विचारसरणीचा प्रचार करणारे सिनेमा बनवण्यासाठी सांगितलं जायचं. माझ्याकडे याचा सबळ पुरावा नसला तरी सध्या ज्या प्रकारेचे मोठे सिनेमा येत आहेत यावरून आपण अंदाज घेऊ शकतो.” असं नसीरुद्दीन शाह म्हणाले आहेत.

माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी नसीरुद्दीन शाह यांनी तालिबानचं समर्थन करून भारतात आनंद साजरा करणाऱ्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर भारतातील काही मुसलमानांनी जल्लोष साजरा केला या वक्तव्यावरून त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं. यावर नसीरुद्दीन शाह म्हणाले, “ज्या लोकांनी जाहीरपणे तालिबानला समर्थन करणारे स्टेटमेंट दिलं मी त्या लोकांबद्दल बोलत होतो. तालिबानचा इतिहास खूप वाईट आहे.” असं म्हणत माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं नसीरुद्दीन शाह म्हणाले.