सोसायटीच्या पार्किंगवरुन एका महिलेला मारहाण केल्याप्रकरणी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी विरोधात त्याच्याच सोसायटीत राहणा-या एका महिलेने रविवारी वर्सोवा पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल केला. सदर महिलेशी इंडियन एक्स्प्रेसच्या वार्ताहरांनी संवाद साधला असता तिने सांगितले की, गेले वर्षभर नवाजुद्दीन या सोसायटीत राहत आहे. येथे आल्यापासून त्याने पार्किंगची संपूर्ण जागा बळकावलीय. त्यामुळे सोसायटी आणि नवाजुद्दीनमध्ये वादही सुरु आहेत. काल संध्याकाळी माझी २४ वर्षीय मुलगी फोटो काढण्यासाठी पार्किंगच्या ठिकाणी गेली होती. त्यावेळी पार्किंगच्या जागेवरून नवाजुद्दीन आणि त्याच्या भावाने माझ्या मुलीला धक्का दिला आणि मारहाण केली. नवाजुद्दीनने मुलीला धमकविण्यासाठी बॉडीगार्ड आणि बाउंसर्सचाही वापर केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वर्सोवा पोलिसांनी रविवारी अभिनेता नवाजुद्दीनविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. दरम्यान, या पूर्ण घटनेचे खंडन नवाजुद्दीनचा भाऊ फैज सिद्दीकी यांनी केले आहे. त्याने अशी घटना घडलीच नाही, असे सांगितले.