नवाजुद्दीनचा सिनेमा म्हटलं की उत्तम अभिनयाची हमखास हमीच असते. लवकरच नवाज कुशन नंदी दिग्दर्शित ‘बाबुमोशाय बंदूकबाज’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.
एकदा हा व्हिडिओ पाहाच, तुमचीही नजर तिच्यावरुन हटणार नाही
नवाजने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून हा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. ट्विटरवर हा ट्रेलर प्रदर्शित करताना त्याने मजेशीर कॅप्शनही लिहिले आहे. तुमने बुलाया और हम चले आए, लो देख लो असे मजेशीर अंदाजात त्याने ट्वीट केले आहे. ‘बाबुमोशाय बंदूकबाज’ या सिनेमात नवाज हा बाबू नावाच्या छोटेखानी काँट्रॅक्ट किलरच्या भूमिकेत दिसत आहे. ‘गँग्स ऑफ वासेपुर’ पासून सुरू असलेली घोडदौड कायम राखत नवाजुद्दीनने आपलं नाणं कसं खणखणीत आहे हे प्रत्येक सिनेमातून दाखवून दिलं आहे.
ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी तो फक्त बंदूक शिकण्यापुरताच थांबला नाही तर जेम्स बॉण्डचे अनेक सिनेमे त्याने पाहिले. याआधी प्रदर्शित केलेल्या सिनेमाच्या टीझरमध्ये नवाजचा तोंडी एक आकर्षक संवाद आहे तो म्हणजे, ‘हम आउटसोर्सिंग करते है, यमराज के लिए. या संवादावरुन सिनेमातील अॅक्शन आणि ड्रामाचा अंदाज किती जबरदस्त असेल हे लक्षात येते.
नवाजसोबत या सिनेमात दिव्या दत्ता, बिदिता बाग, मुरली शर्मा, जतिन गोस्वामी, श्रद्धा दास, अनिल जॉर्ज, जीतू शिव्हारे, भगवान तिवारी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सिनेमात नवाजसोबत ताहिर भसीनही दिसणार आहे. ताहिरने याआधी ‘फोर्स २’ मध्ये काम केले होते. हा सिनेमा याआधी २०१६ मध्ये प्रदर्शित होणार होता. पण काही कारणांमुळे या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. पण आता हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.