दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि विग्नेश शिवन ९ जून रोजी लग्न बंधनात अडकले. ६ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्या दोघांनी सप्तपदी घेतल्या. लग्नानंतर नयनतारा आणि विग्नेश शिवन दुसऱ्याच दिवशी तिरुपती मंदिरात पोहोचले होते. त्या दोघांचे मंदिरातील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. कारण नयनतारा अनवाणी नाही तर चप्पल घालून फिरताना दिसली. यामुळे तिला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.

मंदिराच्या व्यवस्थापनाकडून कायदेशीर नोटीस बजावण्यात आल्यानंतर नयनतारा आणि विग्नेश यांनी जाहीर माफी मागत तिरुमला तिरुपती देवस्थान बोर्डाला माफीपत्र देखील पाठवले आहे. आपल्या निवेदनात त्यांनी लिहिलं, “लग्नानंतर, आम्ही घरी न जाता थेट तिरुपती मंदिरात गेलो आणि एझुमलयनच्या लग्न समारंभाला उपस्थित राहिलो. त्यानंतर मंदिरातून पुष्कळ लोक बाहेर आले आणि त्यांनी आम्हाला घेरले. म्हणून आम्ही तिथून निघालो आणि थोड्या वेळाने परत एझुमलयन मंदिरासमोर आलो.”

आणखी वाचा- कतरिनाच्या आयुष्यात ‘सवती’ची एंट्री? पती विकी कौशलच्या फोटोवरील कमेंट चर्चेत

“आम्ही लगेचच फोटोशूट पूर्ण केले आणि चाहत्यांनी आम्हाला पाहिल्यास ते आम्हाला घेरतील म्हणून तेथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरच्या गोंधळात, आम्ही ज्या भागात बूट घालण्यास मनाई आहे त्या भागात बूट घालून चालत असल्याचे आमच्या लक्षात आले नाही. गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. गेल्या महिन्यात तिरुपती मंदिरात लग्न करण्याच्या इच्छेने आम्ही पाच वेळा तिरुपतीला गेलो आहोत. विविध कारणांमुळे आमचे लग्न तिरुपती मंदिरात आयोजित करणे शक्य झाले नाही,” असे त्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.

आणखी वाचा- गुटखा खाण्याची प्रॅक्टिस! भूमिकेसाठी प्राजक्ता माळीने केली अशी तयारी

दरम्यान तिरुपती मंदिरात किंवा मग त्याच्या आवारात अनवाणी चालणे ही धार्मिक प्रथा आहे. तिथे नयनताराला चप्पल घातलेलं पाहून तिथल्या लोकांनी संताप व्यक्त केला आहे. रिपोर्ट्सनुसार, तिरुमला तिरुपती देवस्थान बोर्डाचे मुख्य सिक्योरिटी ऑफिसर अधिकारी, नरसिंह किशोर यांनी सांगितले की, अभिनेत्री नयनतारा रस्त्यावर चप्पल घालून फिरताना दिसली. ज्याचे धार्मिक महत्त्व मोठे आहे. यादरम्यान नवविवाहित जोडप्याने येथील नियमांचे उल्लंघन केले आहे. जिथे फोटो काढायला परवानगी नाही तिथे फोटो काढत होते. नयनतारा रस्त्यावर चप्पल घालून फिरताना दिसली. आमच्या सुरक्षेने यावर तातडीने कारवाई केली. त्यांनी तिथे फोटोशूटही केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून आमच्या लक्षात आले आहे.