बॉलिवूडच्या अभिनेत्री नीतू कपूर या नेहमीच विविध कारणामुळे चर्चेत असतात. नीतू कपूर यांनी बालकलाकार म्हणून हिंदी सिनेसृष्टीत अभिनयाला सुरुवात केली होती. त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर अनेकांची मनं जिकंली. नीतू कपूर या सध्या सिनेसृष्टीत सक्रीय नसल्या तरी त्या सोशल मीडियावर कायमच अॅक्टिव्ह असतात. त्या नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांच्या या व्हिडीओला अनेकजण लाइक्स आणि कमेंट करताना दिसतात. अनेकदा त्यांना त्यांच्या पोस्टवरुन ट्रोलही केले जाते. नुकतंच त्यांनी या ट्रोलिंगवर भाष्य केले आहे.

नीतू कपूर या लवकरच ‘जुग जुग जियो’ या चित्रपटात झळकणार आहेत. सध्या त्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. यावेळी एका मुलाखतीत त्यांनी ट्रोलिंगवर भाष्य केले. “मी ट्रोलर्सची अजिबात पर्वा करत नाही. कारण ते निनावी लोक असतात. त्यांचे नाव, पत्ता, ओळख याची मला काहीही माहिती नाही. सोशल मीडियावर अकाऊंट बनवून कोणीही कोणालाही ट्रोल करु शकतो.” असेही नीतू कपूर यांनी सांगितले.

“कदाचित माझा ड्रायव्हर किंवा कुक हे देखील मला सोशल मीडियावर शिवीगाळ करत असतील. त्यामुळे मी सोशल मीडिया ट्रोलर्सला कधीच गांभीर्याने घेत नाही. कारण ते कोणताही चेहरा नसलेले अनोळखी लोक आहेत”, असे नीतू कपूर म्हणाल्या.

“आधी अनेक लोक मला ओळखत होते. पण आता हल्लीच्या पिढीतील लोक मला ओळखायला लागले आहेत. ते मला फॉलो करतात याचा मला आनंद आहे. सध्या माझ्या घरी कोणीही नसते. ऋषी कपूर यांच्या जाण्यामुळे घरात प्रचंड शांतता पसरली आहे. मला लोकांशी बोलणं फार आवडते. त्यामुळे आता मला जेव्हा पापराझी भेटतात तेव्हा मी त्यांच्याशी नेहमी गप्पा मारते. त्याचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतात”, असेही त्यांनी म्हटले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘जुग जुग जियो’ हा चित्रपट येत्या २४ जून २०२२ रोजी प्रदर्शित होत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन राज मेहता यांनी केलं आहे. यात वरुण धवन आणि कियारा आडवाणी यांच्या व्यतिरिक्त अनिल कपूर, नीतू कपूर, प्राजक्ता कोळी, मनीष पॉल, टिस्का चोप्रा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.