बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्मा आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा या दोघांचं ‘थोडा थोडा प्यार’ हे गाणं सध्या यूट्यूबवर गाजत असून जवळजवळ १०० मिलियन लोकांनी हे गाणं पाहिलंय. सोबतच या गाण्याच्या छोट्या छोट्या क्लिप्स देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
अभिनेत्री नेहा शर्माने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिलीय. ‘थोडा थोडा प्यार’ या गाण्याचे १०० मिलियन व्ह्यूज पूर्ण झाल्याची माहिती देत तिने आपला आनंद व्यक्त केलाय. या व्हिडीओमध्ये ती आयशासोबत धम्माल डान्स करताना दिसून येतेय.
हा व्हिडीओ शेअर करताना तिने कॅप्शन देखील लिहिली आहे. यात तिने लिहिलंय, “तुमच्या सगळ्यांच्या या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद…! ‘थोडा थोडा प्यार’ या गाण्याने यूट्यूबवर १०० मिलियन व्ह्यूज पूर्ण केले आहेत. रीता शुक्ला तुला तुझं ध्येय माहित आहे…”. तिच्या या व्हिडीओला सुद्धा तिच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात पसंत दिली आहे. तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओला साडे तीन लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.
View this post on Instagram
‘थोडा थोडा प्यार’ या गाण्याबद्दल सांगायचं झालं तर झी म्युझिक कंपनीने हे रोमॅण्टिक सॉंग गेल्या फेब्रूवारीमध्ये त्यांच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर रिलीज केलं होतं. या गाण्यात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री नेहा शर्मा दोघांची केमिस्ट्री आणि रोमॅण्टिक अंदाज पहायला मिळतोय. गायक स्टेबिन बेनने आपल्या सुरेल आवाजत हे गाणं गायलंय. या गाण्याचे शब्द कुमार यांनी लिहिलेत. तर निलेश आहूजा यांनी हे गाणं कंपोज केलंय.
अभिनेत्री नेहा शर्मा हीने नुकतंच तिचा आगामी चित्रपट ‘जोगीरा सारा रा’ची शूटिंग पूर्ण केली आहे. या चित्रपटात ती अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यासोबत झळकणार आहे. या चित्रपटाची निर्मिती टचवूड मल्टीमीडिया क्रिएशन्सचे नईम ए सिद्दीकी यांनी केली आहे. हा चित्रपट यावर्षीच्या अखेरला प्रदर्शित करण्यात येणार असल्याचं बोललं जातंय.