‘नेटफ्लिक्स इंडिया’च्या बऱ्याच वेब सीरिज सध्या प्रकाशझोतात आल्या आहेत. चौकटीबाहेरचं कथानक, तगडे कलाकार आणि सिनेमॅटीक लिबर्टीच्या बळावर या सीरिज मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे ‘सेक्रेड गेम्स’. विक्रमादित्य मोटवाने दिग्दर्शित या वेब सीरिजमधून साकारलेल्या प्रत्येक पात्राची सध्या प्रेक्षकांवर भुरळ पडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनुराग कश्यपचं सहदिग्दर्शन असलेल्या या वेब सीरिजमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी, सैफ अली खान, राधिका आपटे, जितेंद्र जोशी यांच्या भूमिकांविषयी बऱ्याच चर्चा पाहायला मिळत आहेत. ‘सेक्रेड गेम्स’मधून साकारण्यात आलेला काळ आणि त्या माध्यमातून राजीव गांधी आणि तत्कालीन काँग्रेस सरकारवही करण्यात आलेली टीका यामुळे काहीसं राजकारणही रंगलं. अशा या वेब सीरिजमधून साकारण्यात आलेलं कथानक आणि त्यातील संवाद या गोष्टी ‘सेक्रेड गेम्स’च्या जमेची बाजू ठरल्या. पण, न्यायालयाच्या निर्णयानंतर या वेब सीरिजच्या पुढच्या पर्वाचे भाग अद्यापही प्रदर्शित करण्यात आले नव्हते.

Sacred Games : नेटकऱ्यांनाही पडला प्रश्न, ‘कुक्कू’ खरंच ट्रान्सजेंडर आहे का?

मुळात प्रेक्षकांनीही या वेब सीरिजचं पुढचं पर्व प्रदर्शित करण्याची मागणी केली. ज्यानंतर आता नेटफ्लिक्स इंडियाच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक सूचक ट्विट करण्यात आलं आहे. ‘सेक्रेड गेम्स’ प्रेक्षकांच्या भेटीला येऊन जवळपास २५ दिवस झाले आहेत. आम्हाला नाही माहित आज नेमकं काय होणार पण, तरीही त्रिवेदीला सदिच्छा…, असं ट्विट नेटफ्लिक्स इंडियाच्या अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आलं. ज्या ट्विटनंतर अनेकांनीच पुन्हा एकदा या सीरिजच्या दुसऱ्या पर्वाविषयी तर्क लावण्यास सुरुवात केली. मुख्य म्हणजे पंचवीस दिवसांमध्ये होणारा हा खेळ आता कोणतं नवं वळण घेणार हे जाणून घेण्यासाठीच रसिकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Netflix india secred games tweet next season web series
First published on: 31-07-2018 at 18:53 IST