बॉललीवूडची ‘बेबो’ म्हणजे करीना कपूर खान कोणत्या ना कोणत्या कारणामूळे सतत चर्चेत असते. करीना आणि तिचा मोठा मुलगा तैमूर अली खान नेहमीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर असतात. त्यांना छोट्या छोट्या कारणामूळे सतत ट्रोल केलं जात. मात्र आता कारीनाचा धाकटा मुलगा देखील ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. २१ फेब्रुवारी २०२१ला करीनाने आपल्या धाकट्या मुलाला जन्म दिला. त्यानंतर धाकट्या मुलाचे नाव काय? असा प्रश्न सगळ्या चाहत्यांना पडला होता.

काही दिवसांपूर्वी करीना आणि सैफ अली खानने आपल्या धाकट्या मुलाचे नाव ‘जेह’ असून हे नाव त्याचे टोपणनाव असल्याची माहिती नेटकऱ्यांना दिली होती. त्यानंतर आजोबा रणधीर कपूर यांनी देखील आपल्या धाकट्या नातवाचे नाव ‘जेह’ आहे असे एका मुलाखतीत सांगितले होते. आता ट्रोलर्स करीनाच्या छोट्या मुलाल देखील त्याच्या नावावरून ट्रोल करत आहेत.

करीना कपूरच्या मोठ्या मुलाला जसं त्याच्या नावावरुन ट्रोल करण्यात आले होते तसेच आता त्यांच्या छोट्या मुलाला देखील ट्रोल केलं जात आहे. काही नेटकऱ्यांनी ‘जेह’या नावावरुन वेगवेगळी नावं ठेवली आहेत. ‘जेह’ हे जरका टोपण नाव असेल तर खरे नाव काय असेल?असं नेटकऱ्यांनीच वेगवेगळी नावं सुचवली आहेत.

एका युजरने ट्विट केले “मला १०० टके वाटते की सैफ आणि करीनाने त्यांच्या मुलाचे नाव जाहांगीर ठेवले आहे. पण तैमूर सारख ट्रोल होऊ नये म्हणुन त्यांनी जेह हे टोपण नाव ठेवलं असेल.”

दुसरा युजरने ट्विट केले “औरंगजेब, टिपू, खिलजी, अशी मुघलांमध्ये भरपुर नावं आहेत…. ती ठेवायची.”

तीसऱ्या युजरने याचं नाव लैमूर ठेवा असा सल्ला देखील दिला आहे.

करीनाने  डिसेंबर २०१६ ला आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला, त्यानंतर २०२१ तिच्या धाकट्या मुलाच स्वागत तिने केले. ६ महीने झाले असले तरी करीनाने अजूनही आपल्या धाकट्या मुलाला मीडियापासून लांब ठेवले आहे.