बॉलीवूड देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती आणि लोकप्रिय अमेरिकन गायक निक जोनास सतत चर्चेत असतो. जगभरात त्याचे करोडो चाहते आहेत. दरम्यान निकचा एक व्हिडीओ सोशल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा- पंकज त्रिपाठींना आवडतो ‘हा’ मराठमोळा पदार्थ, म्हणाले “आता मुंबईत…”

या व्हिडिओमध्ये निक त्याचा भाऊ केविन जोनस आणि जो जोनासबरोबर स्टेजवर गाताना दिसत आहे. मात्र, गाता गाता अचानक तोल जाऊन निक स्टेजवरुन खाली पडला. पण पडल्यानंतर निक लगेच उभा राहिला आणि पुन्हा गायला सुरुवात केली. निकचा आत्मविश्वास बघून चाहते त्याच कौतुक करत आहेत. तर काहींना त्याच्या तब्येतीची काळजी वाटत आहे.

अनेक चाहत्यांनी निकच्या या व्हिडीओवर कमेंट केली आहे. एका युजरने लिहिले आहे, ‘पडल्यानंतर निक ज्या प्रकारे उठला ते अप्रतिम आहे.’ दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘निकला दुखापत झाली नसेल.’ तर काही लोक कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांना सुनावत आहेत. स्टेजची रचना अशा धोकादायक पद्धतीने का केली आहे, असा प्रश्न काहीजण विचारताना दिसत आहेत.

हेही वाचा- पांढऱ्या फ्रॉकमधील ही गोंडस मुलगी आहे आघाडीची अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?

दरम्यान काही दिवसांपूर्वी निकचा कॉन्सर्टचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दरम्यान निक गाणं गाताना अचानक एक चाहतीने त्याच्यावर अंतर्वस्त्र (ब्रा) फेकलं. चाहतीच्या या कृत्यामुळे निक काही क्षण थांबला आणि नंतर पुन्हा गाणं गाऊ लागला.