भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक घराण्यांपैकी एक म्हणजे अंबानी कुटुंब. हे कुटुंब नेहमी त्यांच्या लाइफस्टाइलमुळे चर्चेत असतं. नुकतीच नीता अंबानी यांनी एक आलिशान गाडी खरेदी केली. सध्या या आलिशान गाडीची चर्चा जोरदार सुरू आहे. नीता अंबानींच्या या गाडीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा व संस्थापक नीता अंबानी यांनी स्वतःसाठी एक रोल्स-रॉयल फँटम VIII (Rolls Royce Phantom VIII) ही गाडी खरेदी केली आहे. या गाडीचा सुंदर रंग, इंटिरियरने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. गाडीचं इंटिरियर लक्झरी लिमोसिन आणि ऑर्किड वेलवेटने तयार केलं आहे.

हेही वाचा – ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ मालिकेतील अभिनेता अडकला लग्नबंधनात, कोण आहे बायको? जाणून घ्या…

नीता अंबानीच्या गाडीच्या हेडरेस्टवर त्यांच्या नावातील सुरुवातीची इंग्रजी अक्षरं लिहिली आहेत. NMP (नीता मुकेश अंबानी), असं हेडरेस्टवर लिहिण्यात आलं आहे. एवढंच नव्हे तर स्पिरिट ऑफ एक्स्टसी सोन्याचं बनवलं आहे. तसंच फँटमवरील डिनर प्लेट व्हील्समुळे नीता अंबानींची नवी गाडी आणखी आकर्षित होतं आहे.

हेही वाचा – ‘सारं काही तिच्यासाठी’ फेम अभिनेत्याचा प्रसिद्ध सोशल मीडिया स्टारशी मोठ्या थाटामाटात साखरपुडा, दोघांच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष

View this post on Instagram

A post shared by BollywoodNow (@bollywoodnow)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नीता यांच्या या नव्या गाडीची किंमत १२ कोटींच्या आसपास असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, नीता अंबानींची ही पहिलीच गाडी नाहीये. गेल्या वर्षी दिवाळीच्या आसपास मुकेश अंबानींनी काळ्या रंगाची रोल्स-रॉयस कलिनन ही गाडी नीता यांना गिफ्ट केली होती. अंबानी कुटुंबाकडे जुन्या व नव्या मॉडलच्या अनेक गाड्या आहेत. फेरारी पुरोसांग्यू, बुलेटप्रूफ मर्सिडीज-बेंज S-क्लास, रेंज रोवर LWB अशा अनेक आलिशान गाड्या आहेत.