“काय भंगार गाणं आहे हे…”,नोराचं ‘डान्स मेरी राणी’ गाणं पाहून नेटकरी संतापले

गुरु रंधावा आणि नोराचं हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे.

nora fatehi, dance meri raani, guru randhawa,
गुरु रंधावा आणि नोराचं हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही ही तिच्या डान्समुळे ओळखली जाते. नोरा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकतचं नोरा आणि गुरुरंधावाचं एक नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे. हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर नोराला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

नोराने या गाण्याचा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत नोराचा जलपरीचा लूक प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे. प्रेक्षकांना नोराचा हा लूक आवडला आहे. मात्र, काही नेटकऱ्यांना हे गाणं आवडलं नाही आहे. त्यामुळे त्या गाण्याच्या बोलावरून त्यांनी नोरा आणि गुरु रंधावाला ट्रोल केले आहे.

आणखी वाचा : ‘गहराइयां’च्या टीझर पेक्षा दीपिकाचा किस आणि बिकिनी चर्चेत!

आणखी वाचा : “घटस्फोटित सेकंड हँड…”, म्हणणाऱ्या ट्रोलरला समांथाचे सडेतोड उत्तर

आणखी वाचा : कपिल शर्मा एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी घेतो इतके पैसे, अभिनेत्याचा खुलासा

नोरा आणि गुरु रंधावाला ट्रोल करत हसायते इमोटिकॉन वापरत एक नेटकरी म्हणाला, “गुरुरंधावा नोराला ६६ वेळा नाच म्हणाला तेव्हा ती नाचली.” दुसरा नेटकरी हे गाणं चांगल नव्हतं असं म्हणतं म्हणाला, “हे गाणं ऐकल्यानंतर टोनी कक्कडसाठी असलेला मान वाढला आहे.” तिसरा नेटकरी म्हणाला, “टोनी कक्कड नाच आणि डान्स बोलण्याचा रेकॉर्ड यांनी मोडला.” आणखी एक नेटकरी म्हणाला, “तुझा जलपरीचा लूक पाहण्यासाठी गाणं पाहिलं पण हे सगळ्यात खराब गाणं होतं.” दुसरा नेटकरी म्हणाला, “तू मस्त दिसतेस पण हे गाणं भंगार आहे…कानातून रक्त यायला लागलं आहे”, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nora fatehi got trolled for her new song with guru randhawa dance meri rani dcp

Next Story
दिग्दर्शकाने ‘कट’ म्हटल्यानंतरही इम्रान हाश्मीला किस करत होती अभिनेत्री, शूटिंग दरम्यानचा व्हिडीओ व्हायरल
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी