Viral Video : सोशल मीडियावर दर दिवशी अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. कोणी गाणी म्हणताना तर कोणी डान्स करताना दिसतात. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, सांगता येत नाही. सध्या असाच एक आश्चर्यचकीत करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी सलुनमध्ये बसून चक्क दाढी करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून कोणीही चक्रावून जाईल. काही लोकांना हा व्हिडीओ पाहून विश्वास बसणार नाही. तुम्ही आजवर पुरुषांना सलुनमध्ये बसून दाढी करताना पाहिले असेल पण या व्हिडीओमध्ये चक्क तरुणी न्हावीच्या हातून दाढी करताना दिसत आहे

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुणी सलुनमध्ये बसलेली दिसेल. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की तरुणीच्या गालावर शेव्हिंग क्रीम लावली आहे आणि न्हावी या तरुणीची दाढी करताना दिसत आहे. ती शांतपणे दाढी करताना दिसते आणि त्यानंतर जागेवरून उठते. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे आणि केव्हाचा आहे, याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही पण सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : याला म्हणतात मैत्री! पाकिस्तानी मित्राला पाठवला घराचा दरवाजा, १९४७ च्या फाळणीनंतर पहिल्यांदा दरवाजा पाहून…; व्हिडीओ होतोय व्हायरल

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : Nagpur Video: हा कोणता नियम! शॉर्ट पॅन्टमुळे बँकेत No Entry; नागपूरच्या तरुणाचा व्हिडीओ होतोय व्हायरल..

HasnaZaruriHai या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “हा ट्रेंड कधी सुरू झाला?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “अरे काय होत आहे?” तर एका युजरने लिहिलेय, बिचारीला दाढी ये असेल” आणखी एका युजरने लिहिलेय, “जेंडर समानता” बारा हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. अनेक युजर्सनी व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त केले आहेत.