आघाडीची दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आज करोडो लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे. तिचे फॅन फॉलोइंगही जबरदस्त आहे. भारतात तसेच भारताबाहेर तिचे मोठ्या संख्येने चाहते आहेत. तर ‘पुष्पा’ चित्रपटातील तिच्या कामाचं खूप कौतुक झालं. आज तिचा वाढदिवस आहे. अभिनय क्षेत्रात येण्याच्या आधी रश्मिकाने यशस्वीपणे तिचं शिक्षण पूर्ण केलं आहे.

रश्मिकाने २०१४ साली कूर्गमधून क्लीन एंड क्लियर फ्रेश फेस ही स्पर्धा जिंकली होती. ही स्पर्धा जिंकल्यानंतर तिला याच ब्रॅंडची जाहिरात मिळाली. याच फेसवॉशच्या जाहिरातीमध्ये एका दिग्दर्शकाची नजर तिच्यावर पडली आणि तिला तिचा पहिला ब्रेक मिळाला. त्यानंतर तिने कन्नड चित्रपट ‘किरिक पार्टी’ मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तर त्यानंतर तिने २०१८ साली रोमँटिक ड्रामा ‘चलो’ मधून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली.. त्यानंतर आलेल्या ‘चमक’ साठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेअरचं नामांकन मिळालं. या पाठोपाठ ”गीता गोविंदम’ आणि ‘डिअर कॉम्रेड’ दोन्हीही हिट ठरले आणि रश्मिका घराघरात पोहोचली.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
Raj Thackeray, mahayuti support
राज ठाकरे यांच्या भूमिकेत कायमच सातत्याचा अभाव
randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”
lokmanas
लोकमानस: भाजपची हूल आणि गडी बाद

आणखी वाचा : रश्मिका मंदाना विजय देवरकोंडाला नाही तर ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्याला करतेय डेट?; जाणून घ्या सत्य

अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी तिने तिचं शिक्षण पूर्ण केलं आणि मगच तिने या क्षेत्रात पाऊल टाकलं. कूर्ग पब्लिक स्कूलमधून आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर तिने रमैया कॉलेज ऑफ आर्ट्स, साइंस अँड कॉमर्स महाविद्यालयातून मानसशास्त्र, पत्रकारिता आणि इंग्रजी साहित्यात बॅचलर पदवी मिळवली आहे.

हेही वाचा : Video: …अन् श्रीवल्ली मराठीत बोलू लागली, रश्मिका मंदानाचा मराठमोळा अंदाज चर्चेत

दरम्यान, रश्मिका मंदाना लवकरच ‘ॲनिमल’ या हिंदी चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकेल. तर या चित्रपटात तिच्याबरोबर अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिका साकारणार आहे. तर याचबरोबर बहूप्रतीक्षित ‘पुष्पा २’ या चित्रपटात ती पुन्हा एकदा श्रीवल्लीच्या भूमिकेत दिसेल.