बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका ही चित्रपटांमध्ये सक्रिय नसली तरी तिचे लाखो चाहते आहेत. मलायका सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत मलायका चाहत्यांच्या संपर्कात राहते. तर गेल्या काही दिवसांपासून मलायका तिच्या आणि अर्जुन कपूरच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. पण आता मलायका तिच्या मुलामुळे म्हणजेच अरहानमुळे चर्चेत आली आहे.

मलायका आणि अरहानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. मलायकाने इंडियाज बेस्ट डान्सर २ या रिअॅलिटी शोमध्ये आता तिच्या आणि अरहानच्या नात्यातला आणखी एक खुलासा केला आहे. मलायकाने सांगितले की अरहान तिला आई म्हणून हाक मारत नाही. तो तिला नेहमी वेगवेगळ्या नावांनी हाक मारतो. अरहान तिला कधी ब्रो म्हणून हाक मारतो.

आणखी वाचा : “मी उघड्यावर शौचाला बसलो आणि मागे वळून पाहतो तर हॉलिवूडचे…”, करण जोहरने सांगितला ‘तो’ लाजिरवाणा किस्सा

आणखी वाचा : अभिनेत्री रवीना टंडनच्या वडिलांचे निधन

View this post on Instagram

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मलायकाला तिची आई बेटा म्हणून हाक मारते. तर एकदा तिने तिच्या आईला बेटा म्हणून का हाक मारते असा प्रश्न विचारला असता, तिची आई म्हणाली तू माझं पहिलं मुलं आहेस, म्हणून मी तुला बेटा म्हणून हाक मारते. मलायका अनेक रिअॅलिटी शोमध्ये परिक्षक म्हणून दिसली आहे.