जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक असलेल्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्सची खूप चर्चा असते. ८१ वा गोल्डन ग्लोब पुरस्कार २०२४ सोहळ्यातील विजेत्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. हा सोहळा ७ जानेवारी रोजी (भारतीय वेळेनुसार ८ जानेवारी रोजी सकाळी ६:३० वाजता) पार पडला. स्टँड-अप कॉमेडियन आणि अभिनेता जो कोय याने हा सोहळा होस्ट केला. यंदाच्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये ‘बार्बी’, ‘ओपनहायमर’, ‘किलर्स ऑफ द फ्लॉवर मून’, ‘पास्ट लाइव्ह्स’ आणि ‘पुअर थिंग्ज’ यांना सर्वाधिक नामांकनं मिळाली होती.

गोल्डन ग्लोब पुरस्कार २०२४ च्या विजेत्यांच्या यादीत ‘बार्बी’ आणि ‘ओपनहायमर’ या दोन चित्रपटांचा जलवा पाहायला मिळाला. ‘ओपनहायमर’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आणि या चित्रपटाचा मुख्य नायक सिलियन मर्फी याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तर ‘किलर्स ऑफ द फ्लॉवर मून’ अभिनेत्री लिली ग्लॅडस्टोन हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

बिपाशा बासूने पती अन् मुलीसह मालदीवमध्ये साजरा केला वाढदिवस, वादादरम्यान फोटो आले समोर

गोल्डन ग्लोब विजेत्यांची यादी –

सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर – ड्रामा: ओपनहायमर
ओपनहायमर
किलर्स ऑफ द फ्लॉवर मून
द झोन ऑफ इंटरेस्ट
अॅनाटॉमी ऑफ द फॉल
माईस्ट्रो
पास्ट लाइव्ह्ज

सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अभिनेत्री (मोशन पिक्चर, ड्रामा):

लिली ग्लॅडस्टोन – किलर्स ऑफ द फ्लॉवर मून
केरी मुलिगन – माईस्ट्रो
ग्रेटा ली – पास्ट लाइव्ह्ज
कैली स्पेनी – प्रिसिला
सँड्रा हलर – अॅनाटॉमी ऑफ द फॉल
ऍनेट बेनिंग – न्याड

पद्मिनी कोल्हापूरे होणार आजी, सूनेच्या डोहाळे जेवणाचे फोटो चर्चेत, श्रद्धा कपूरच्या मराठी लूकने वेधलं लक्ष

सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर – म्युझिकल/कॉमेडी:
अमेरिकन फिक्शन
बार्बी
होल्डओव्हर्स
मे डिसेंबर
एअर
पूअर थिंग्स

सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा अभिनेता (मोशन पिक्चर, म्युझिकल/कॉमेडी):

पॉल गियामट्टी फॉर द होल्डओव्हर्स
निकोलस केज – ड्रीम सिनॅरियो
टिमोथी चालमेट – वोंका
जोक्विन फिनिक्स – ब्यु इज अफ्रेड
जेफ्री राइट – अमेरिकन फिक्शन
मॅट डेमन – एअर
पॉल गियामट्टी – द होल्डओव्हर्स

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटिक आणि बॉक्स ऑफिस अचिव्हमेंट:
बार्बी
गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी व्हॉल 3
जॉन विक: चॅप्टर 4
मिशन: इम्पॉसिबल – डेड रेकनिंग पार्ट वन
ओपनहायमर
स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स
सुपर मारिओ ब्रदर्स चित्रपट
टेलर स्विफ्ट: द इरास टूर

बेस्ट स्कोअर (मोशन पिक्चर):
ओपेनहायमर – लुडविग गोरानसन
पूअर थिंग्स – जर्स्किन फेन्ड्रिक्स
किलर्स ऑफ द फ्लॉवर मून – रॉबी रॉबर्टसन
द झोन ऑफ इंटरेस्ट – मीका लेव्ही
स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स – डॅनियल पेम्बर्टन
द बॉय अँड द हेरॉन- जो हिसैशी

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (मोशन पिक्चर):
ख्रिस्तोफर नोलन – ओपेनहायमर
योर्गोस लॅन्थिमोस – पूअर थिंग्स
मार्टिन स्कोर्से – द किलर्स ऑफ फ्लॉवर मून
ब्रॅडली कूपर – माइस्ट्रो
ग्रेटा गेरविग – बार्बी
सेलीन गाणे – पास्ट लाइव्ज

“उद्धवजी आले, सोफ्यावर बसले अन्…”, पक्ष प्रवेशानंतर किरण मानेंनी सांगितला ‘मातोश्री’तील अनुभव; म्हणाले, “शत्रू फिक्स झाला…”

सर्वोत्कृष्ट अभिनेता (मोशन पिक्चर, ड्रामा):
सिलियन मर्फी-ओपनहायमर
ब्रॅडली कूपर – माइस्ट्रो
बॅरी केओघन – सॉल्टबर्न
लिओनार्डो डिकॅप्रियो – द किलर्स ऑफ द फ्लॉवर मून
कोलमन डोमिंगो – रस्टिन
अँड्र्यू स्कॉट – ऑल ऑफ अस स्टेंजर्स

बेस्ट पिक्चर (अॅनिमेटेड):
द बॉय अँड द हेरॉन
इलेमेंटल
स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स
सुपर मारिओ ब्रदर्स चित्रपट
सुझुम
विश

बेस्ट ड्रामा सीरिज:

सक्सेशन
1923
द क्राउन
द डिप्लॉमॅट
द लास्ट ऑफ अस
द मॉर्निंग शो