तुम्ही जर ओटीटीवर एखादा चांगला अॅक्शन थ्रिलर चित्रपट शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण एक दमदार सिनेमा थिएटरनंतर अखेर ओटीटीवर रिलीज झाला आहे. उत्तम रेटिंग असलेला हा चित्रपट तुम्हाला आता घर बसल्या प्राइम व्हिडीओवर पाहता येणार आहे.
थिएटर रिलीजनंतर या चित्रपटाची बरीच चर्चा होती. अनेकांनी चित्रपटाचं कौतुक केलं होतं. ज्यांना हा थिएटरमध्ये पाहता आला नव्हता त्यांना आता हा चित्रपट ओटीटीवर पाहता येणार आहे. ओटीटीवर रिलीज होताच हा चित्रपट टॉप १० ट्रेंडिंग चित्रपटांच्या यादीत आला आहे.
एका महिन्यापूर्वी थिएटरमध्ये रिलीज झाला चित्रपट
ओटीटीवर अनेक अॅक्शन आणि क्राइम थ्रिलर उपलब्ध असले तरी, हा चित्रपट या वर्षातील टॉप रेटेड चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपटाचे नाव ‘The 100’ आहे जो या वर्षी ११ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. राघव ओंकार शशिधर दिग्दर्शित या तेलुगू चित्रपटात सागर, मीशा नारंग आणि धन्या बालकृष्णन मुख्य भूमिकेत आहेत.
द 100 चित्रपटाची कथा
द 100 ची कथा एका धाडसी आयपीएस अधिकाऱ्याची आहे, जो शहराच्या बाहेरील भागात होणाऱ्या दरोड्यांमागील गुन्हेगारांना शोधण्यासाठी एका मोहिमेवर जातो. पण नंतर त्याची आरती नावाच्या महिलेची भेट होते. यानंतर, कथेत असा ट्विस्ट की तुम्ही हा चित्रपट शेवटपर्यंत पाहण्यापासून स्वतःला रोखू शकणार नाही.
ओटीटी केव्हा व कुठे पाहायचा चित्रपट?
तुम्ही द 100 हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये पाहिला नसेल, तर काळजी करू नका. कारण तो ओटीटीवर आला आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, द 100 हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर अवघ्या दोन दिवसांतच प्राइम व्हिडिओच्या टॉप १० ट्रेंडिंग चित्रपटांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. या चित्रपटाला आयएमडीबीवर ८.४ रेटिंग मिळाले आहे.
