प्राइम व्हिडीओवरील प्रचंड गाजलेल्या भारतीय वेब सीरिजपैकी एक म्हणजे ‘मिर्झापूर’ होय. या लोकप्रिय सीरिजचे तिसरे पर्व जुलै महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज या सीरिजचा दमदार ट्रेलर लाँच झाला. या अॅक्शन थ्रिलर सीरिजमध्ये पंकज त्रिपाठी, अली फझल, रसिका दुग्गल, श्वेता त्रिपाठी, विजय वर्मा यांच्यासह अनेक कलाकार आहेत. या सीरिजमध्ये पंकज त्रिपाठींचे पात्र कालीन भैयाच्या पत्नीची म्हणजेच बीना त्रिपाठीची भूमिका अभिनेत्री रसिका दुग्गलने साकारली आहे.

‘मिर्झापूर ३’ ५ जुलै रोजी प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ‘मिर्झापूर’मध्ये बीना त्रिपाठीची भूमिका करून लोकप्रिय झालेल्या रसिका दुग्गलने या सीरिजमध्ये अनेक इंटिमेट सीन्स दिले आहेत. आता रसिकाने बोल्ड सीन्स व तिला अभिनयक्षेत्रात कराव्या लागलेल्या संघर्षाबद्दल भाष्य केलं आहे. रसिकाने सांगितलं की तिला आजवर अनेकदा नकाराचा सामना करावा लागला आहे. तिला काम मागितल्यावर मिळालं. तसेच तिला अनेक चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका कराव्या लागल्या.

Video: दुसऱ्या लग्नानंतर सात महिन्यांनी आई झाली अभिनेत्री, बाळाचं नावही ठेवलंय खूपच खास, पतीने शेअर केला व्हिडीओ

‘नवभारत टाइम्स’शी बोलताना रसिका दुग्गलने खुलासा केला की तिने तिच्या करिअरमध्ये एकूण १४ असे चित्रपट केले, ज्यामध्ये तिचे फक्त एक किंवा दोन सीन होते. ‘अनवर’ हा तिचा पहिला चित्रपट होता आणि त्यात तिचे फक्त दोनच सीन होते. नकाराबद्दल बोलताना रसिका म्हणाली, “मला वाटतं की नकार हा प्रत्येक क्रिएटिव्ह व्यक्तीच्या प्रवासाचा एक भाग असतो. सुरुवातीला मला वाईट वाटायचं, पण मी फिल्म इन्स्टिट्यूटमधून आले होते आणि माझ्याबरोबरचे सगळेच या टप्प्यातून जात होते, त्यामुळे मी एकटी आहे असं मला कधीच वाटलं नाही. काहीवेळा मला चित्रपट मिळाले, तर काही वेळा मी ऑडिशन्स दिल्या, पण काम मिळालं नाही.”

ट्रेनमध्ये पहिली भेट अन् लग्नाचा निर्णय, आजही पतीपासून दूर राहतात अलका याज्ञिक; वाचा हटके लव्ह स्टोरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मिर्झापूर’पूर्वी रसिकाने अनेक चांगल्या भूमिका केल्या होत्या, पण या सीरिजने तिला प्रसिद्धी मिळवून दिली आणि बिना त्रिपाठीच्या भूमिकेने ती घराघरात पोहोचली, असं ती स्वतः सांगते. ‘मिर्झापूर’मधील इंटिमेट सीनबद्दल रसिका म्हणाली, “रिहर्सलच्या वेळीच मला जाणवलं की मी त्या वातावरणात कंफर्टेबल आहे. या सीनबद्दल दिग्दर्शक खूप संवेदनशील होते. इंटिमेट सीनसाठी वेगळा सेट तयार करण्यात आला होता. या सेटवर फक्त मोजकेच लोक उपस्थित होते. तसेच कोणाच्याही उपस्थितीमुळे मला अनकंफर्टेबल वाटत असेल तर मी सांगावं असं दिग्दर्शकाने म्हटलं होतं,” अशी माहिती रसिकाने दिली.