नेटफ्लिक्सवरील द ग्रेट इंडियन कपिल शोचा तिसरा सीझन संपणार आहे. शोच्या शेवटच्या भागात अभिनेता अक्षय कुमार हजेरी लावणार आहे. बुधवारी, शोच्या निर्मात्यांनी शेवटच्या भागाचा ट्रेलर प्रदर्शित केला, ज्यामध्ये या एपिसोडची झलक दाखवण्यात आली आहे.

प्रोमोची सुरुवात अक्षय कुमारच्या एन्ट्रीने झाली. अक्षयच्या एंट्रीने कपिल शर्माचे लक्ष वेधून घेतले. त्याने विचारलं “एवढ्या मुली का? तू ‘किस किस को प्यार करूं’ मध्ये काम करत आहेस का?” यावर अक्षय कुमार म्हणाला, “या माणसाला १५ वर्षांच्या संघर्षानंतर पहिला ब्रेक मिळाला.”

पुढे कपिल शर्मा म्हणाला, “तू नेहमी वेळेवर येतोस… पण तू आमच्या शोमध्ये यायला इतका उशिर का केलास, कारण हा आमच्या तिसऱ्या सीझनचा शेवटचा एपिसोड आहे?” यावर अक्षय कुमार कपिलला म्हणाला, “कारण तू मला पैसे दिले नाहीस.”

अक्षय नंतर कपिल शर्माच्या इन्स्टाग्राम पोस्टवरील कमेंट्स वाचतो आणि त्याला चिडवतो. त्यावर हे सेगमेंट वाईट आहे, असं कपिल म्हणतो. “तू कमाल अॅक्शन करतोस, रोमान्स करणं शिकण्याचा डिप्लोमा असतो का? की वैयक्तिक अनुभव कामी येतो,” असं कपिलने विचारल्यावर अक्षय म्हणतो, “रोमान्सचा कोर्स असतो. अनुभवदेखील असतो. हे सगळं पत्नी शिकवते. आपली पत्नी शिकवते.”

पाहा व्हिडीओ-

अक्षयने नंतर स्टंट युनिटमधील त्याच्या मित्रांची ओळख करून दिली आणि म्हणाला, “मी स्वतःला आधी स्टंटमॅन समजतो आणि नंतर अभिनेता.” अक्षय कुमारने त्याच्या करिअरचं श्रेय स्टंटमॅनना दिलं. ते माझ्यासाठी खरे हिरो आहेत. कारण त्यांच्यामुळेच माझे करिअर घडले आहे,” असं म्हणत अक्षय कुमारने भावना व्यक्त केल्या.

यानंतर अक्षय कुमारने स्टेजवर काही अॅक्टिव्हिटीजमध्ये भाग घेतला. तसेच अक्षय कुमारने किकू शारदा, सुनिल ग्रोव्हर व कृष्णा अभिषेक यांच्याबरोबर स्टंट्सही केलेत.

शेवटी नवज्योत सिंग सिद्धू यांनी कपिल शर्माचं कौतुक केलं. “कपिल शर्मा एकमेव कॉमेडियन आहे जो स्मशानात दंगल घडवू शकतो,” असं ते म्हणतात. मग अक्षयचंही कौतुक करतो, तो पाहुणा आहे, असं सिद्धू म्हणाले. यावर अक्षय नकार देतो. “कपिलचं कौतुक करा, मला कौतुक नको पैसे द्या,” असं अक्षयने म्हटल्यावर सर्वजण हसू लागतात. द ग्रेट इंडियन कपिल शोचा हा एपिसोड शनिवारी नेटफ्लिक्सवर प्रसारित होईल.