scorecardresearch

बॉक्स ऑफिसवर नव्हे तर OTT वर अक्षय कुमारचा बोलबाला; सर्वाधिक पाहिले गेलेले तीन चित्रपट खिलाडी कुमारचेच

नुकताच त्याचा प्रदर्शित झालेला ‘राम सेतू’ हा चित्रपटही फारशी कमाल दाखवू शकला नाही

बॉक्स ऑफिसवर नव्हे तर OTT वर अक्षय कुमारचा बोलबाला; सर्वाधिक पाहिले गेलेले तीन चित्रपट खिलाडी कुमारचेच
फोटो : इंडियन एक्सप्रेस

अक्षय कुमार अनेक दिवसांपासून बॉक्स ऑफिसवरील हीट चित्रपटासाठी तरसला आहे यात काहीच शंका नाही. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला ‘सूर्यवंशी’ हा त्यांचा शेवटचा सुपरहीट चित्रपट ठरला. यानंतर त्यांचे बहुतेक सगळेच चित्रपट एकापाठोपाठ एक सपशेल आपटले. पण अक्षय कुमार मार ओटीटी विश्वावर राज्य करत असल्याचं नुकतंच उघड झालं आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर अक्षयच्या चित्रपटांनी हॅट्रिक मारली आहे.

अक्षय कुमारचे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक पहिले गेले आहेत असं हे सलग तिसऱ्या वर्षी घडत आहे. हे चित्रपट प्रथम मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार होते, पण नंतर कोविड आणि इतर काही कारणास्तव हे चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आले. २०२० मध्ये अक्षयचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ डिस्ने प्लस हॉटस्टारवर सर्वाधिक पाहिलेला चित्रपट ठरला.

आणखी वाचा : बॉलिवूडचा ‘सिरियल किसर’ आणि ‘खिलाडी’ येणार आमने सामने; करण जोहरने केली चित्रपटाबद्दल मोठी घोषणा

यानंतर 2021 मध्येच अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाने ओटीटी रिलीजवर दर्शकांचे वेगवेगळे रेकॉर्ड तोडले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केलीच पण ओटीटीवरही या चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. यावर्षी अक्षयचा ‘कठपुतली’ हा चित्रपट हॉटस्टारवर प्रदर्शित झाला. हा चित्रपट यावर्षीचा ओटीटीवर सर्वाधिक पाहिला जाणारा हिंदी चित्रपट ठरला आहे. नुकतंच अक्षय कुमारने याबद्दल सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून स्पष्ट केलं आहे.

२०२१ नंतर अक्षयचे ‘अतरंगी रे’, ‘बच्चन पांडे’, ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘रक्षाबंधन’ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटले. नुकताच त्याचा प्रदर्शित झालेला ‘राम सेतू’ हा चित्रपटही फारशी कमाल दाखवू शकला नाही. अक्षय आता ‘ओह माय गॉड २’ आणि ‘सेल्फी’ या दोन चित्रपटात झळकणार आहे, शिवाय ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठी चित्रपटात अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.

मराठीतील सर्व ओटीटी ( Ott ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-01-2023 at 15:41 IST

संबंधित बातम्या