Heart of stone Trailer : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी ‘हार्ट ऑफ स्टोन’ या हॉलिवूडपटामुळे चर्चेत आहे. सध्या आलिया या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ब्राजीलमध्ये आहे. आलियाच्या या हॉलिवूड चित्रपटामध्ये गॅल गॅडोट आणि जेमी डोर्नन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा फर्स्ट लूक व्हिडीओ प्रदर्शित झाला होता. ज्यात आलिया भट्ट अॅक्शन अवतारात पाहायला मिळाली होती.

नुकताचा याचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये आलिया भट्ट गॅल गॅडोटसह अॅक्शन करताना दिसणार आहे. चित्रपटात आलिया एका गुप्त एजंटची भूमिका निभावत आहे, इतकंच नव्हे तर ट्रेलरवरुन आलिया यामध्ये नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे हे स्पष्ट झालं आहे. अगदी मोजक्या सीन्समध्येच आलिया आपल्याला दिसते पण तिची भूमिका फार महत्त्वाची आहे.

आणखी वाचा : दुसऱ्याच दिवशी ‘आदिपुरुष’ला बसणार जबरदस्त फटका; बॉक्स ऑफिसवर कमावणार फक्त ‘इतके’ कोटी

सोशल मीडियावर या ट्रेलरची लोक प्रचंड प्रशंसा करताना दिसत आहेत. आलियाच्या काही चाहत्यांनी तिच्या भूमिकेच्या कमी लांबीबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे. तर काही चाहत्यांनी तिचं खूप कौतुक केलं आहे. ट्रेलरवरुन हा एक क्राइम थ्रिलर चित्रपट वाटत आहे. चित्रपटाचं पार्श्वसंगीतही कथेला साजेसं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आलिया भट्टचा हा ‘हार्ट ऑफ स्टोन’ ११ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. याचदिवशी चित्रपटगृहात आणखी ३ मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’, सनी देओलचा ‘गदर २’ अन् अक्षय कुमारचा ‘ओह माय गॉड २’ हे तीनही चित्रपट याच दिवशी प्रदर्शित होणार आहे. ‘हार्ट ऑफ स्टोन’मधून आलिया हॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. शिवाय तिचा अन् रणवीर सिंगचा ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ हा चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.