अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या चांगलीच चर्चेत आहे. ‘बिग बॉस १७’मध्ये अंकिता पती विकी जैनबरोबर सहभागी झाली आहे. अंकिताने टेलव्हिजन क्षेत्रात १७ वर्ष पूर्ण केले आहेत. बिग बॉसच्या घरात अंकिताने आत्तापर्यंत तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. बिग बॉसच्या घरात अंकिताने तिच्या स्ट्रगल काळातील आठवणी सांगितल्या आहेत.
हेही वाचा- सुशांत सिंह राजपूतबरोबर ब्रेकअप का झाले? अंकिता लोखंडेने सांगितले कारण; म्हणाली, “एका रात्रीत तो…”
मुनव्वर फारुखी याच्याशी बोलताना अंकिताने तिच्या संघर्षाच्या दिवसांबद्दल सांगितले. अंकिता म्हणाली, “एक काळ असा होता की माझ्याकडे खरोखर पैसे नव्हते. जेवण करु की ऑडिशनला जाऊ असा प्रश्न माझ्यासमोर होता. कारण आई-वडिलांकडे किती दिवस मी पैसे मागणार होते.”
अंकिता पुढे म्हणाली, “जेव्हा मी ‘पवित्र रिश्ता’ मध्ये काम करत होते तेव्हा मला दररोज २००० रुपये मिळायचे. माझ्या खात्यात ५० हजार रुपये जमा झाल्यावर मला खूप आनंद झाला. पहिल्यांदा मी इतके पैसे होते. त्या काळात माझे आई-वडील माझी ताकद होते. माझ्या ब्रेकअपनंतरही अंकिताशी लग्न कोण करणार असा प्रश्न लोक विचारायचे. पण माझे आई-वडील माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.”
हेही वाचा- Bigg Boss 17: इशाने ‘बिग बॉस ओटीटी २’ विजेता एल्विश यादवलाही दिलाय धोका?; व्हिडीओ शेअर करत म्हणाला…
‘पवित्र रिश्ता’ मालिकेची निर्माता एकता कपूर होती. २००९ मध्ये ही मालिका प्रसारित झाली होती. कमी काळातच या मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. या मालिकेत अंकिता आणि सुशांत सिंह राजपूतन मुख्य भूमिका साकारली होती. अंकिता आणि सुशांतच्या जोडीला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली होती. ऑनस्क्रिनप्रमाणे ऑफस्क्रिनही सुशांत अंकिता एकमेकांच्या प्रेमात पडले. ७ वर्ष दोघं रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, त्यानंतर दोघांच ब्रेकअप झालं. नुकतंच अंकिताने या ब्रेकअपमागचं कारण सांगितलं आहे.