Best Horror Series in Hindi: जर तुम्हाला वाटत असेल की हॉरर चित्रपट किंवा सीरिज पाहून तुम्हाला भीती वाटत नाही, तर मग नेटफ्लिक्सवरील ही सीरिज तुम्ही नक्की पाहायला हवी. ही मिनी सीरिज तुम्ही एकटे असताना पाहू शकणार नाही, इतकी दमदार आहे. तुमच्याकडे जर नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन असेल तर तुम्ही ही सीरिज अजिबात चुकवू नका.
‘घोल’ ही तीन भागांची हॉरर-थ्रिलर मिनी-मालिका आहे. ही २०१८ मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली होती. याचे दिग्दर्शन पॅट्रिक ग्रॅहमने केले होते. ब्लमहाऊस प्रॉडक्शन, फँटम फिल्म्स आणि इव्हानहो पिक्चर्स यांनी त्याची निर्मिती केली होती. सेक्रेड गेम्स नंतर आलेली ही नेटफ्लिक्सची दुसरी भारतीय ओरिजनल सीरिज होती.
मुख्य भूमिकेत आहे राधिका आपटे
‘घोल’ सीरिजमध्ये राधिका आपटे नीदा रहीम नावाच्या भूमिकेत आहे. ती लष्करी इंटेरोगेटर असते. ही कथा एका डिस्टोपियन फ्यूचर सेटमध्ये घडते. इथले सरकार खूप कडक नियमांचे पालन करणारे असते. एका डिटेंशन सेंटरमध्ये एक गूढ कैदी, अली सईद (महेश बलराज) विचित्र वागत असतो. नीदा त्याच्या भूतकाळात डोकावते तेव्हा तिला एक भयानक सत्य समजतं, जे चक्रावून सोडणारं असतं.
IMDb वर रेटिंग किती?
घोलला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. समीक्षकांनी यातील हॉरर दृश्यांचं कौतुक केलं. अनेक युजर्सच्या मते राधिका आपटेने या सीरिजमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनय केला आहे. या मिनी-सीरिजला IMDb वर ७ रेटिंग मिळाले आहे.
कुठे पाहायची Ghoul सीरिज?
तुम्ही नेटफ्लिक्सवर घोल ही सीरिज पाहू शकता. ही तीन भागांची सीरिज आहे. प्रत्येक भाग सुमारे ४५ मिनिटांचा आहे. तुमचा वीकेंडचा प्लॅन नसेल तर ही सीरिज तुम्ही आरामात पाहू शकता. या सीरिजची थीम व भीतीदायक दृश्ये तुम्हाला खिळवून ठेवतील. पण तुम्हाला हॉरर सीरिज बघायची सवय नसेल तर घरात एकटे असताना ही सीरिज पाहू नका.
खरं तर भयपट किंवा हॉरर सीरिज म्हटलं की आपल्याकडे चित्रपट फक्त भुतांपुरते मर्यादित असतात. पण घोल यापेक्षा वेगळी आहे. राजकीय मुद्दे आणि भीती यांचं अनोखं मिश्रण या सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे. एक चांगली कथा असलेली हॉरर सीरिज जर तुम्हाला बघायची असेल तर ‘घोल’ तुमच्यासाठीच आहे.