अभिनेत्री भूमी पेडणेकर ही तिच्या कामामुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या कामाप्रमाणे ती तिच्या वक्तव्यांमुळे ही सर्वांचं लक्ष तिच्याकडे वेधून घेत असते. तिचा विचार ती अगदी स्पष्टपणे मांडताना दिसते. तिला आलेले अनुभव तिला न पडणाऱ्या गोष्टी यांबद्दल ती तिचे विचार उघडपणे मांडते. आता ‘लस्ट स्टोरीज’ या चित्रपटात तिने दिलेल्या बोल्ड सीनबद्दल तिने भाष्य केलं आहे.

‘लस्ट स्टोरीज’ चित्रपट चार लघुपटांचा संच आहे. त्यातील एका चित्रपटात भूमी पेडणेकर हिनेही काम केलं आहे. या चित्रपटात तिचा अभिनेता नील भूपालम याच्याबरोबर एक सेक्स सीन आहे. त्यांच्या या लघुपटाचं दिग्दर्शन झोया अख्तर हिने केलं आहे. हा सीन देणं भूमीसाठी कठीण होतं. हा अनुभव तिने नुकताच एका मुलाखतीत शेअर केला आहे.

आणखी वाचा : “मी कोणाचंही काम हिसकावून घेतलं नाही, पण तरीही…” श्रुती हासनचं बॉलिवूडबद्दल मोठं वक्तव्य

‘बॉलिवूड हंगामा’शी या चित्रपटातील या सीनबद्दल बोलताना भूमी म्हणाली, “हा सीन करताना मी खूप अस्वस्थ होते. पण झोयाने आम्हा दोघांच्या मनातल्या भावना ओळखल्या आणि आम्हाला धीर दिला. मी नर्वस होते कारण त्यावेळी अनेक लोक असलेल्या एका रूममध्ये माझ्या शरीरावर खूप कमी कपडे होते. सीन शूट करण्यासाठी आम्ही सर्व काळजी घेतली होती. त्यावेळी मी आणि नील आम्ही एकत्र बसून एकमेकांशी संवाद साधला होता. आपली मर्यादा काय आहे यावर आम्ही बोललो होतो. असे सीन शूट करताना तुमचं दिग्दर्शक आणि सहकलाकाराशी झालेलं बोलणं तुम्हाला अधिक मानसिक बळ देतं, जे खूप महत्त्वाचं आहे.”

हेही वाचा : “हा तर उर्फी जावेदचा प्रभाव!”; भूमी पेडणेकरची अजब ड्रेसिंग स्टाईल बघून नेटकरी गोंधळले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भूमी पेडणेकर व्यतिरिक्त ‘लस्ट स्टोरीज’ या चित्रपटात विकी कौशल, कियारा अडवाणी, राधिका आपटे, मनीषा कोयराला हे आघाडीचे कलाकार झळकले होते. चित्रपट २०१८ साली ‘नेटफ्लिक्स’वर रिलीज झाला होता.