हिंदी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेता अविनाश सचदेव अलीकडेच ‘बिग बॉस ओटीटी सीझन २’ मध्ये सहभागी झाला आहे. अविनाश सचदेव गेली १८ वर्ष विविध मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महत्त्वाचे म्हणजे, ‘बिग बॉस’मध्ये अविनाशची पूर्वाश्रमीची गर्लफ्रेंड पलक पुरसवानी सुद्धा सहभागी झाली आहे. यापूर्वी अविनाश आणि पलक एकत्र ‘नच बलिए ९’ मध्ये सहभागी झाले होते.

हेही वाचा : बॉलीवूड की साऊथ काय निवडशील? दृश्यम फेम अभिनेत्रीने स्पष्टच सांगितले; म्हणाली, “कितीही मोठा स्टार असो…”

अविनाश सचदेवने ‘बिग बॉस ओटीटी सीझन २’ मध्ये सहभागी होण्यापूर्वी ‘इंडिया टुडे’ला मुलाखत दिली होती. यावेळी अभिनेत्याने त्याच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांबाबत खुलासा केला आहे. अविनाश म्हणाला, “गेल्या काही वर्षांपासून माझ्या आयुष्यात अनेक घडामोडी घडत आहेत. तो काळ सर्वात वाईट होता…२०२० मध्ये जेव्हा कोरोनाची साथ आली तेव्हापासून ते २०२३च्या सुरुवातीपर्यंत माझ्या आयुष्यात काहीच चांगले होत नव्हते. मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या मी पूर्णपणे खचलो होतो. पैसा, काम काहीच नव्हते, या कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी माझ्या आई-वडिलांनी मला खूप मदत केली.”

हेही वाचा : ‘आदिपुरुष’नंतर क्रिती सेनॉन दिसणार रोमॅंटिक भूमिकेत, ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्याबरोबर शेअर करणार स्क्रीन

अविनाश पुढे म्हणाला, जेव्हा मला ‘बिग बॉस ओटीटी’साठी विचारणा करण्यात आली तेव्हा मी पूर्ण घाबरलो होतो. मला कळत नव्हते मी काय केले पाहिजे. निर्मात्यांना मी फोन करून सांगितले होते की, माझा या कार्यक्रमासाठी नकार नाही. पण, एकदा मला तुम्हाला भेटायचे आहे. पुढे निर्मात्यांना भेटल्यावर मी खूप हिंमतीने शोमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा : Video : करण देओलच्या रिसेप्शनमध्ये रणवीर-दीपिकाने केला जबरदस्त डान्स; व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘बिग बॉस ओटीटी सीझन-२’या नव्या पर्वाला सुरुवात झाली असून, प्रेक्षकांना जिओ सिनेमा आणि व्हूट सिलेक्टवर हा कार्यक्रम विनामूल्य पाहता येणार आहे.