‘बिग बॉस ओटीटी’ च्या दुसऱ्या सीझनची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. बिग ओटीटीचे थेट लाइव्ह प्रक्षेपण जिओ सिनेमावर केले जाते. दुसऱ्या सीझनमध्ये नवाजुद्दिन सिद्दिकीची पत्नी आलिया सिद्दिकी सुद्धा सहभागी झाली होती. आलियाचे बिग बॉसच्या घरात पूजा भट्टबरोबर अनेकदा वाद झाल्याचे पाहायला मिळाले होते. याबाबत आलिया सिद्दिकीने आता घराबाहेर पडल्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा : जेएनयूमध्ये 72 Hoorain चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग, निर्मात्यांचा मोठा निर्णय; म्हणाले, “दहशतवादी घटना…”

आलिया सिद्दिकी म्हणाली, “बिग बॉसच्या घरात असताना माझ्यावर नवाजुद्दिनची पत्नी असल्याचा फायदा घेत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. परंतु, मी कधीच त्याची पत्नी असल्याचा गैरफायदा घेतलेला नाही. याउलट पूजा भट्ट अनेकदा वडिलांच्या नावाचा फायदा घेते.”

हेही वाचा : छोट्या पडद्यावर उलगडणार सिंधुताईं सपकाळ यांचा जीवनपट; किरण माने दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत, म्हणाले…

आलिया सिद्दिकीने बॉलीवूडमध्ये निर्माती म्हणून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, गेल्या काही काळापासून ती पती नवाजुद्दीनबरोबर सुरू असलेल्या घरगुती वादामुळे चर्चेत आहे. नुकत्याच झालेल्या मीडिया संवादादरम्यान आलिया म्हणाली, “बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सीझनमध्ये मला संधी मिळाली कारण, निर्मात्यांना माझी क्षमता माहिती होती. मी अन्यायाविरुद्ध आवाज उठवू शकते, कदाचित याच कारणामुळे मी या शोमध्ये आले. “

हेही वाचा : कार्तिक-कियाराच्या ‘सत्यप्रेम की कथा’मधील वादग्रस्त शब्दांवर सेन्सॉर बोर्डाची कात्री, निर्मात्यांनी चित्रपटात केले ‘हे’ बदल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आलियाने पुढे सांगितले, “पूजा भट्ट तिच्या वडिलांचे नाव घेऊन व्हिक्टिम कार्ड खेळत आहे. अनेकदा ती मी महेश भट्ट यांची मुलगी आहे अशी ओळख करून देते पण, ती स्वत: पूजा भट्ट आहे हे ती विसरते. तिला वडिलांच्या ओळखीच्या टॅगची काय गरज आहे?” असे अनेक प्रश्न उपस्थित करत आलिया सिद्दिकीने पूजा भट्टवर टीका केली आहे.