Bigg Boss OTT 3 Fame Actor Welcome Baby Boy : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकद्वारे आपले करिअर सुरू करणारा प्रसिद्ध युट्यूबर म्हणजे अदनान शेख. त्यानंतर तो ‘बिग बॉस’ ओटीटीच्या तिसऱ्या सीझनमध्येही सहभागी झाला होता. वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून सहभागी झालेला अदनान या शोमुळे चांगलाच प्रसिद्धीझोतात आला होता. गेल्यावर्षी सप्टेंबर २०२४ मध्ये त्याने आयेशा शेखबरोबर विवाहगाठ बांधली.

लग्नानंतर नऊ महिन्यांतच अदनानने चाहत्यांना खुशखबर दिली आहे. अदनान शेख आणि त्याची पत्नी आयेशा शेखनं एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. दोघांना मुलगा झाला आहे आणि ही आनंदाची बातमी अदनाननं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केली आहे. अदनानने त्याला मुलगा झाल्याची बातमी एक खास व्हिडीओ शेअर करत दिली आहे.

अदनानने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये अनेक स्लाइड्स आहेत. पहिल्या स्लाईडमध्ये ‘या जगात तुझं स्वागत आहे’ असं लिहिलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या स्लाईडमधून त्याने मुलगा झाल्याचं लिहिलं आहे. पुढे अदनाननं त्याच्या बाळाबरोबरचा फोटो कॅरिकेचर स्वरुपात पोस्ट केला आहे. तर इतर स्लाइडमध्ये गोड मॅसेजही लिहिला आहे. अदनाननं अद्याप बाळाच्या नावाचा खुलासा केलेला नाही.

हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये, “अल्लाहनं गोंडस बाळाच्या स्वरुपात आम्हाला आशीर्वाद दिला आहे. मी आता एवढा खूश आहे की, मला माझ्या भावना व्यक्त करणं शक्यच नाही. मी खूपच भावुक झालो आहे. मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. माझ्या बाळावर तुमचा आशीर्वाद असूद्या.” दरम्यान, या व्हिडीओखाली कमेंट्समध्ये अदनानला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

‘टाइम्स ऑफ इंडिया’नुसार अदनानने त्याच्या वडील झाल्याच्या भावना व्यक्त करत असं म्हटलं, “वडील होणं ही जगातील सर्वात आनंदाची गोष्ट आहे. यापूर्वी मी कधीही कोणत्या गोष्टीसाठी इतका उत्सुक नव्हतो. मी नेहमीच माझ्या सर्व जबाबदाऱ्या गांभीर्याने स्वीकारल्या आहेत. जर मी मुलगा, भाऊ आणि पती म्हणून माझ्या १००% दिले असेल; तर आता माझ्या मुलासाठी मी २००% देईन.”

दरम्यान, अदनानबद्दल सांगायचं झालं तर, तो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि मॉडेल आहे. काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये अदनान सहभागी झाला होता. याव्यतिरिक्त ‘ऐस ऑफ स्पेस २’या शोमध्येही अदनान दिसला होता. सोशल मीडियावर त्याचा खूप मोठा चाहतावर्ग आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अदनानची पत्नी आयेशाबद्दल बोलायचं झालं तर, तिचं खरं नाव रिद्धी जाधव असल्याचे अनेक वृत्तांमध्ये म्हटले होते. ‘नवभारत’च्या वृत्तानुसार, अदनानची बहीण इफ्तनेही आयेशा प्रत्यक्षात हिंदू होती आणि तिने अदनानबरोबर लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला असल्याचं म्हटलं होतं. आयेशा इंडिगोमध्ये एअर होस्टेस म्हणून काम करत होती. पण नंतर तिने नोकरी सोडली.