गेल्या काही वर्षांपासून ‘बिग बॉस ओटीटी’ सुरू झालं आहे. आतापर्यंत ‘बिग बॉस ओटीटी’चे तीन पर्व झाले आहेत. सध्या टेलिव्हिजनवरील ‘बिग बॉस’चं १८ पर्व सुरू आहे. या पर्वातील सदस्य शो चांगलाच गाजवत आहे. जबरदस्त वाइल्ड कार्डच्या एन्ट्रीनंतर ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वातील वातावरण बदललं आहे. अशातच दुसऱ्या बाजूला दुःखद बातमी समोर आली आहे.

‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या पर्वात झळकलेली अभिनेत्री आशिका भाटियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या डोक्यावरील वडिलांचं छत्र हरपलं आहे. याबाबत तिने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत वडिलांचं निधन झाल्याचं सांगितलं आहे.

हेही वाचा – Video: “तुम्ही बेअक्कल लोक आहात…”, मुंबईच्या ट्रॅफिकमधील ‘ती’ कृती पाहून गौतमी देशपांडे भडकली, म्हणाली…

आशिकाने लहान वयात अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. तिने सलमान खानच्या ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटात तिने सलमानच्या छोट्या बहिणीची भूमिका निभावली होती; यामुळे आशिक प्रसिद्धीच्या झोतात आली. आशिकाचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. ६.४ मिलियन पेक्षा अधिक तिने फॉलोवर्स आहेत.

आशिका भाटियाने वडिलांच्या निधनाची बातमी इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली. तिने वडिलांबरोबरचा फोटो शेअर करत भावुक पोस्ट लिहिली. आशिकाने लिहिलं की, मी तुमच्यावर खूप प्रेम करते. बाबा, मला माफ करा. वडिलांच्या निधनामुळे आशिकला मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा – Video: “दारू, सिगारेट प्यायची असेल तर…”, सिद्धार्थ जाधवच्या आईने दिला होता मोलाचा सल्ला, अभिनेता किस्सा सांगत म्हणाला…

हेही वाचा – Video: “गळ्यात मंगळसूत्र…”, ‘शाका लाका बूम बूम’ फेम किंशुक वैद्यच्या बायकोने घेतला जबरदस्त उखाणा, पाहा व्हिडीओ

दरम्यान, आशिका भाटियाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती बालपणापासून अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. ‘मीरा’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. या मालिकेत तिने मीराची भूमिका निभावली होती. त्यानंतर ‘सोनी टीव्ही’ वाहिनीवरील ‘परवरिश कुछ खट्टी कुछ मीठी’मध्ये आशिका झळकली. या मालिकेत तिने गिन्नीची भूमिका साकारली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय मोठ्या पडद्यावर ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटाच्या माध्यमातून तिने सलमानसह सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि अनुपम खेर यांच्याबरोबर स्क्रीन शेअर केली होती. मग लोकप्रिय झाल्यानंतर आशिका ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वात सहभागी झाली. या पर्वात तिची वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री झाली होती. आशिका आपल्या अभिनयाबरोबर हॉटनेस आणि घायाळ अदांमुळे चर्चेत असते.