बॉलिवूडच्या किंग खान शाहरुख खानने त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटातून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. अजूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवत आहे. शाहरुखच्या चाहत्यांनी आणि एकूणच चित्रपट रसिकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलं. प्रदर्शनाआधी हा चित्रपट वेगवेगळ्या कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला, पण त्यामुळे चित्रपटाचं फारसं नुकसान झालं नाही.

चित्रपटगृहात इतिहास रचल्यानंतर आता ‘पठाण’च्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शनाची सगळेच आतुरतेने वाट बघत आहेत. अजून या चित्रपटाच्या निर्मात्यांनी याच्या ओटीटी रिलीजबद्दल अधिकृत घोषणा केली नसली तरी ‘पठाण’ प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे सर्वश्रुत आहे. हा चित्रपट ज्यांनी चित्रपटगृहात पाहिला आहे त्यांच्यासाठी ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटात एक खास सरप्राइज असणार आहे असं दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी स्पष्ट केलं आहे.

आणखी वाचा : Bheed trailer : टाळेबंदीचं दाहक वास्तव, सामान्यांचा असामान्य लढा; अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘भीड’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

‘गलाट्टा प्लस’च्या मुलाखतीमध्ये सिद्धार्थ आनंद यांना ‘पठाण’ला कोणताही धर्म किंवा नाव नाही यामागील कारण विचारण्यात आलं. याविषयी सिद्धार्थ आनंद म्हणाले की हे त्यांनी ठरवून केलेलं नाही. सिद्धार्थ म्हणाले, “त्याचं काहीच नाव नाहीये, शिवाय तो एका चित्रपटगृहात सापडला होता ज्याचं नाव होतं ‘नवरंग’ आणि यानंतर तो ‘पठाण’ कसा बनला हे सगळं एडिटिंगमध्ये आम्हाला काढावं लागलं, कदाचित याच्या ओटीटी व्हर्जनमध्ये प्रेक्षकांना या गोष्टी बघायला मिळतील.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिद्धार्थ यांनी याबद्दल निश्चित अशी माहिती दिली नसली तरी ‘पठाण’च्या ओटीटी व्हर्जनमध्ये अशा बऱ्याच वेगळ्या गोष्टी पाहायला मिळतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. शाहरुखचे चाहते यासाठी चांगलेच उत्सुक आहेत. ‘पठाण’ने जगभरात १००० कोटीहून अधिक कमाई केली असून भारतात या चित्रपटाने ५११ कोटींपेक्षा जास्त कमाई करत ‘बाहुबली’सारख्या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे.