पहिल्यांदाच असं घडलंय की एक चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत तो ओटीटीवरही प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाला आयएमडीबीवर चांगले रेटिंग मिळाले आहे. तरीही तो दुसऱ्याच दिवशी ओटीटीवर रिलीज करण्यात आला आहे.
‘DNA’ असं या चित्रपटाचं नाव आहे. हा तमिळ चित्रपट आहे. हा चित्रपट तेलुगूमध्ये My Baby नावाने प्रदर्शित करण्यात आला आणि दुसऱ्याच दिवशी DNA नावाने हिंदी व इतर भाषांमध्ये ओटीटीवर रिलीज करण्यात आला. तुम्हाला हॉरर व सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट पाहायला आवडत असतील तर DNA नक्की पाहा. यामध्ये अथर्व मुरली व निमिषा सजयान यांनी उत्तम अभिनय केला आहे.
डीएनएची कथा
या चित्रपटाची कथा आनंद व त्याची पत्नी दिव्या यांच्याभोवती फिरते. अथर्वला दारूचे व्यसन असते तर दिव्याला बॉर्डरलाइन पर्सनॅलिटी डिसऑर्डर असतो. दिव्या व आनंदला रुग्णालयात त्यांचं बाळ सोपवलं जातं, पण दिव्याला वाटतं की हे बाळ बदललंय. इथून कथेत वळण येतं. आधी सगळ्या गोष्टी दुर्लक्ष करणारा आनंद हळूहळू दिव्याचं म्हणणं गांभीर्याने घेऊ लागतो. दोघेही बाळाचं सत्य शोधतात. त्यानंतर त्यांना समजतं की रुग्णालयात बाळांची अदलाबदल केली जाते.
अथर्व मुरलीने आपली भूमिका अत्यंत उत्तम पद्धतीने साकारली आहे. स्वतःशी लढत सत्यासाठी उभा राहणारा अथर्व सिनेमात भाव खाऊन जातात. दुसरीकडे आईच्या भूमिकेत निमिषाने दमदार काम केलंय. या चित्रपटात बालाजी शक्तीवेल, विजी चंद्रशेखर व रित्विका आहेत.
पाहा ट्रेलर
डीएनएचे IMDb रेटिंग
DNA ला IMDb वर 7.4 रेटिंग मिळाले आहे. हा इंटेन्स थ्रिलर सिनेमा तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. या चित्रपटात आई-वडील या नात्याची गुंफण ज्या पद्धतीने दाखवण्यात आली आहे ती तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते. तसेच चित्रपटातील ट्विस्टदेखील विचार करायला भाग पाडतात. डीएनए हा चित्रपट तुम्ही हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड व मल्याळम भाषेत जिओ हॉटस्टारवर पाहू शकता.