शाहरुख खान आणि दीपिका पदूकोणचा ‘पठाण’ हा चित्रपट सुपरहीट ठरला. वेगवेगळे रेकॉर्ड या चित्रपटाने मोडले. हा चित्रपट यश चोप्रा यांच्या ‘यश राज फिल्म्स’ या बॅनरखाली बनला असून ‘यश राज’च्या गेल्या काही वर्षांतील हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. ज्या यश चोप्रा यांनी ‘यश राज फिल्म्स’ची सुरुवात केली त्यांच्यावर बेतलेला एक माहितीपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘फादर ऑफ रोमान्स’ अशी ओळख असणाऱ्या यश चोप्रा यांच्यावर बेतलेल्या ‘द रोमॅंटिक्स’ या माहितीपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये यश चोप्रा यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायला मिळणार आहेत. चित्रपटसृष्टीत त्यांचं नाव कसं मोठं झालं? शिवाय त्यांना फादर ऑफ रोमान्स का म्हंटलं जातं यामागील बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायला मिळणार आहेत.

आणखी वाचा : पापाराझींना पाहताच नेहा कक्कर वैतागली, म्हणाली “कृपया माझे फोटो काढू नका कारण…”

चित्रपटसृष्टीतील मोठमोठे कलाकार यामध्ये यश चोप्रा यांच्या वेगवेगळ्या आठवणीदेखील शेअर करणार आहेत. या ट्रेलरमध्ये आपल्याला शाहरुख खान, आमिर खान, ऋषि कपूर, अमिताभ बच्चनपासून रणवीर सिंग, हृतिक रोशन अभिषेक बच्चन, माधुरी दीक्षित, राणी मुखर्जी, भूमी पेडणेकरसारखे कलाकार आपल्याला बघायला मिळतात. यश चोप्रा यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव त्यांनी यामध्ये शेअर केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सीरिजचं दिग्दर्शन स्मृती मुंध्रा यांनी केलं आहे. व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्त १४ फेब्रुवारीला ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या वेब सीरिज आणि चित्रपट प्रदर्शित होत असतात. शिवाय या प्लॅटफॉर्मवरील माहितीपटालादेखील नेटकऱ्यांची पसंती मिळते. आता नेटफ्लिक्सवर रिलीज होणाऱ्या यश चोप्रा यांच्यावर आधारित ‘द रोमांटिक्स’च्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.