scorecardresearch

“माझं लग्न अयशस्वी…”; फराह खानने दिल्या जुन्या आठवणींना उजाळा

फराहने ९ डिसेंबर २००४ रोजी शिरीष कुंदरशी लग्न केलं.

“माझं लग्न अयशस्वी…”; फराह खानने दिल्या जुन्या आठवणींना उजाळा

दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान तिच्या दिलखुलास स्वभावामुळे चर्चेत असते. अलीकडे तिने मलायका अरोराच्या ‘मुव्हिंग विथ मलायका’ या रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली. या खास भागात तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या. यावेळी वयात ८ वर्षांचे अंतर असलेल्या शिरीष कुंदरशी लग्न केल्यावर तिच्या मित्राने त्यावर एक वाईट कमेंट केली होती असा खुलासा तिने केला.

फराहने ९ डिसेंबर २००४ रोजी शिरीष कुंदरशी लग्न केलं. आता त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. फराह खानने तिच्यापेक्षा ८ वर्षांनी लहान असलेल्या शिरीष कुंदरशी लग्न केल्यावर तिच्या ओळखीतल्या सर्वांनाच आश्चर्य वाटलं होतं. त्यावेळी अनेकांनी तिच्या या निर्णयावर विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. तर दुसरीकडे मलायका अरोरा तिच्यापेक्षा १२ वर्षांनी लहान अर्जुन कपूरला डेट करत असल्याने तिला अनेकदा ट्रॉल केलं जातं. त्यावर चर्चा करत असताना फराहने तिला आलेला अनुभव शेअर केला.

आणखी वाचा : अखेर ‘त्या’ चर्चांना पूर्णविराम; ‘हेरा फेरी ३’मध्ये अक्षय कुमार दिसणार की नाही याचा झाला खुलासा

फराह खानचं लग्न अयशस्वी होईल असं तिच्या जवळच्या काही लोकांना वाटत होतं. ती म्हणाली, “जेव्हा माझं लग्न होत होतं, तेव्हा कोणीतरी माझ्या मित्राला विचारलं की तो माझ्या लग्नाला जाणार आहे का? त्या प्रश्नाचं उत्तर देताना माझा मित्र म्हणाला की, “नाही. पण दुसरं लग्न असेल तेव्हा मी जाईन.”

हेही वाचा : Photos: तब्बूच्या ग्रँड बर्थडे सेलिब्रेशनचा प्लॅन फिस्कटला; शेवटी घरीच केली शिल्पा शेट्टी आणि फराह खानबरोबर पजामा पार्टी

फराहच्या या बोलण्याला मलायकानेही दुजोरा दिला. ती म्हणाली की, तीही या सगळ्यातून गेली आहे. मलायका म्हणाली, “हे सोपं नाही. दैनंदिन जीवनात या गोष्टीला सामोरं जाणं कठीण आहे आणि हे केवळ वयाने मोठ्या असलेल्या महिलांबरोबरच घडतं. जर एखाद्या पुरुषाने २० किंवा ३० वर्षांनी लहान मुलीला डेट केलं तर त्याचं कौतुक केलं जातं. पण महिलांबरोबर असं होत नाही.”

मराठीतील सर्व ओटीटी ( Ott ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 18:52 IST

संबंधित बातम्या