२ वर्षांच्या अंतरानंतर प्राइम व्हिडिओची बहुचर्चित ‘फोर मोअर शॉट्स प्लीज’ या वेबसीरिजचा तिसरा सीझन प्रदर्शनासाठी सज्ज आहे. नुकताच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्यावर लोकांच्या मिश्र प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळत आहेत. ही सीरिज जेव्हा प्रदर्शित झाली तेव्हा लोकांनी याला पसंती दर्शवली पण यामध्ये असलेली अतिरंजित बोल्ड सीन्समुळे सीरिजवर टीकादेखील बरीच झाली. या सीरिजचे दोन्ही सीझन पाहून लोकांनी “या चौघी फक्त सेक्सचाच विचार करत असतात का?” असा प्रश्न विचारला होता.

याच सीरिजमधल्या मुख्य भूमिकेत काम करणाऱ्या अभिनेत्रींनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये याविषयी स्पष्टीकरण दिलं आहे. या शोवर होणाऱ्या टिकेबद्दल बोलताना अभिनेत्री कीर्ती कुल्हारी म्हणाली, “हो ‘फोर मोअर शॉट्स प्लीज’ हा शो सेक्स संदर्भातच आहे. जगातही तुम्हाला अशा गोष्टी बऱ्याच बघायला मिळतील. भारताची लोकसंख्या केवढी आहे याचा आपल्याला अंदाज आहेच. त्यामुळे जगात ज्या गोष्टी सुरू आहेत, त्या आम्ही स्पष्टपणे या सीरिजमधून मांडत आहोत. आम्ही लोकांच्या टीकांचं स्वागत करतो, कारण प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार आहे.”

आणखी वाचा : “दिवाळी कुठे साजरी करू…” उर्वशी रौतेलाचा प्रश्न; चाहते म्हणाले, आधी ऋषभची…

केवळ सेक्स नव्हे तर महिलांचं अशा पद्धतीने सादरीकरण करण्याबद्दल अभिनेत्री सयानी गुप्ता म्हणाली, “हा एक अत्यंत दुर्मिळ शो आहे. हे असं चित्रण तुम्हाला कोणत्याही चित्रपटात दिसणार नाही. खऱ्या आयुष्यातदेखील स्वतःच्या sexual preference आणि orgasm विषयी कोण उघडपणे बोलतं? देशात अशा कित्येक स्त्रिया आहेत ज्यांना मुलं झाली आहेत पण त्यांनी आजवर कधीच orgasm अनुभवला नाहीये किंबहुना त्यांना या शब्दाबद्दल माहितीही नाहीये. आपले विचारच संकुचित झाले आहेत. सेक्स आणि स्त्री याविषयी आजही बोलताना लोकांची नाकं मुरडतात.”

याच सीरिजमध्ये समलैंगिक मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री बानी जे हिनेसुद्धा याविषयी तीचं मत व्यक्त केलं आहे. ती म्हणते, “आपल्या पुरुषप्रधान समाजात स्त्रीने स्वतःचं मत मांडणं याकडे अजूनही वेगळ्याच नजरेतून पाहिलं जातं. कधी, कुठे, कोणाबरोबर शारीरिक संबंध ठेवावे हे ठरवायचा अधिकार जसा पुरुषांना आहे तसंच महिलांनाही ती मुभा आहे, आणि जर महिलांनी नकार दिला तर पुरुषांचा इगो दुखवला जातो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिसऱ्या सीझनमध्ये कीर्ती कुल्हारी, सयानी गुप्ता, बानी जे, मानवी गागरू या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. शिवाय नवीन सीझनमध्ये जिम सर्भ, रोहन मेहरा, शिल्पा शुक्ला आणि सुशांत सिंग ही कलाकार मंडळी नव्याने दिसणार आहेत. या सीरिजचे केवळ भारतातील नव्हे, तर जगभरातील प्रेक्षकांनी कौतुक केले आहे. ही सीरिज २१ ऑक्टोबर रोजी भारत आणि आणखी २४० देशात प्रसारित होणार आहे.