करोना काळापासून लोकांना ओटीटीचे वेड लागले आहे. या प्लॅटफॉर्म्समुळे प्रेक्षकांना वेगवेगळ्या शैलीमधले चित्रपट, वेब सीरिज, डॉक्युमेंट्रीज पाहण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. दिग्दर्शकांनाही या माध्यमाने नवे विषय हाताळण्याची संधी दिली आहे. ओटीटीच्या उदयाने बऱ्याच कलाकारांना काम करण्यासाठी व्यासपीठ मिळाले आहे. आजकाल दर महिन्याला नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ, हॉटस्टार अशा प्लॅटफॉर्म्सवर नवनवीन कलाकृती प्रदर्शित होत असतात.

नोव्हेंबर महिना बिंज वॉच प्रेमींसाठी मेजवानी असणार आहे. या महिन्यामध्ये अनेक दर्जदार चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटीद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘ब्रह्मास्त्र भाग १ शिवा’ आणि ‘पोन्नियिन सेल्वन भाग १’ असे दोन बिगबजेट सप्टेंबर महिन्यामध्ये बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले होते. हे दोन्ही चित्रपट आता ओटीटी रिलीजसाठी सज्ज झाले आहेत. रणबीर कपूर-आलिया भट्ट यांचा ‘ब्रह्मास्त्र’ डिज्नी प्लस हॉटस्टारवर, तर मणी रत्नम दिग्दर्शित मल्टीस्टारर ‘पोन्नियिन सेल्वन’ अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक हे दोन्ही चित्रपट ४ नोव्हेंबरपासून पाहू शकणार आहेत.

आणखी वाचा – अमिताभ बच्चन चाहत्यांना भेटण्याआधी चप्पल का काढतात? कारण आहे खास

११ नोव्हेंबर रोजी राजकुमार राव, हुमा कुरेशी, राधिका आपटे यांचा ‘मोनिका, ओ माय डार्लिंग’ हा चित्रपट थेट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटांव्यतिरिक्त अनेक नव्या सीरिजसुद्धा लोकांना ओटीटीवर पाहता येणार आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये ‘एनोला होम्स सीझन २’, ‘1899’, ‘द क्राऊन सीझन ५’ अशा इंग्रजी वेब सीरिज नेटफ्लिक्स या माध्यमावर रिलीज होणार आहेत.

आणखी वाचा – “खत्म, टाटा, बाय बाय…” कतरिना कैफच्या फोटोवरील विकी कौशलची कमेंट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओची निर्मित ‘ब्रीद : इन टू द शॅडोज’ या लोकप्रिय सीरिजचा दुसरा सीझन ५ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सीरिजद्वारे अभिषेक बच्चन बऱ्याच कालावधीनंतर तो वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. याशिवाय ‘तणाव’ (सोनी लाइव्ह), ‘मुखबीर: द स्टोरी ऑफ स्पाय’ (झी 5) यांसारख्या सीरिजसुद्धा ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर दाखल होणार आहेत.