जिनिलीया देशमुख व मानव कौल यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘ट्रायल पीरियड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात एका अपारंपरिक कुटुंबाच्या एकत्र येण्याची एक कथा दाखवली आहे. यामध्ये शक्ती कपूर, शीबा चड्डा, गजराज राव आणि झिदान ब्राझ सहायक भूमिकांमध्ये आहेत. हा चित्रपट २१ जुलै २०२३ रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे.

पंतप्रधान मोदी व योगींना इस्लाम धर्म स्वीकारण्याचे निमंत्रण देणाऱ्या मौलवीवर जावेद अख्तर संतापले; म्हणाले, “या मूर्खाला…”

ही कथा एका अविवाहित आईच्या जीवनाभोवती फिरते. तिचा मुलगा एकेदिवशी आपण ट्रायल पीरियडवर बाबा मागवू, आवडला नाही तर परत पाठवून देऊ, असं म्हणतो. त्यानंतर ते ते ३० दिवसांच्या ट्रायल पिरियडवर एका व्यक्तीला त्याचा बाबा म्हणून बोलावतात. बाबाची भूमिका मानव कौलने साकारली आहे. तो घरी आल्यानंतर अपारंपरिक कौटुंबिक नातेसंबंध, व्यक्तिमत्व संघर्ष आणि अनपेक्षित बंध आणि नात्यातली आव्हानं याभोवती कथा पुढे सरकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चित्रपटाबद्दल जिनिलीया देशमुख म्हणते, “मी माझ्या आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहे, जिथे मी चित्रपटाची निवड त्याच्या गुणवत्तेवर न करता त्याच्या गुणवत्तेसाठी करते.” तर, मानव कौल म्हणाला, “हा चित्रपट एक भावनिक रोलरकोस्टर आहे. या चित्रपटासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे. यातील प्रत्येक पात्र तुम्हाला एक वेगळा दृष्टिकोन देईल. या चित्रपटाचं शुटिंग मी पूर्ण केल्यावर माझ्या आईने मला खरोखर एक हृदयस्पर्शी पत्र लिहिले होते. हा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल,” अशी आशा त्याने व्यक्त केली.