संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हीरामंडी: द डायमंड बाजार’ या वेब सीरिजचा सध्या सर्वत्र बोलबोला सुरू आहे. या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव, रिचा चड्ढा, संजीदा शेख, शर्मिन सेगल प्रमुख भूमिकेत झळकल्या आहेत. या वेब सीरिजची जितकी चर्चा आहे तितकीच यामधील कलाकारांच्या कामाची चर्चा आहे. ‘हीरामंडी’मधील अनेक सीन व्हायरल झाले आहेत. अशातच या सीरिजमध्ये इंटीमेट सीन देणारा अभिनेता जेनस शाह ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वात झळकणार असल्याचं समोर आलं आहे.

‘हीरामंडी’ सीरिजमध्ये जेसन शाहने ‘कार्टराइट’ची भूमिका केली आहे. ब्रिटीश पोलीस अधिकाऱ्याच्या रुपात जेसन झळकला आहे. सीरिजमधील त्याच्या दमदार अभिनयाचं खूप कौतुक होतं आहे. अशातच जेसनला ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वाची ऑफर मिळाल्याचं वृत्त आलं आहे.

हेही वाचा – ‘बिग बॉस १६’ विजेता रॅपर MC Stanचा झाला ब्रेकअप, भावुक पोस्ट करत म्हणाला, “जेव्हा दुर्लक्ष केलं जातं आणि…”

जर जेसनने ही ऑफर स्वीकारली तर तो पहिल्यांदा ‘बिग बॉस’मध्ये पाहायला मिळणार असं नाहीये. याआधी ‘बिग बॉस’च्या १०व्या पर्वात जेसन सहभागी झाला होता. ‘बिग बॉस’च्या १०व्या पर्वात जेसनची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली होती. पण दोन-तीन आठवड्यानंतर प्रकृतीच्या कारणास्तव अभिनेत्याला बेघर व्हावं लागलं होतं. या पर्वाचा विजेता मनवीर गुर्जर झाला होता. आता येत्या काळात ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वात जेसन पाहायला मिळणार की नाही? हे स्पष्ट होईल.

दरम्यान, ‘हीरामंड’मधील जेसन शाहच्या दोन सीनची खूप चर्चा होतेय. एक सीनमध्ये त्याने उस्ताद जीच्या भूमिकेत असलेल्या इंद्रेशबरोबर इंटीमेट सीन केला आहे. याशिवाय अभिनेता मनीषा कोईरालाचं लैंगिक शोषण करताना देखील पाहायला मिळत आहे. अलीकडेच एका मुलाखतीमध्ये जेसनने मनीषा कोईरालबरोबरच्या त्या सीनबद्दल संगितलं. तो म्हणाला, “तो सीन करताना खूप संकोच होता. संजय सरांना खूप इच्छा होती की, मी मनीषा कोईराला जोरात कानशिलात द्यावी. पण असं करणं माझ्यासाठी खूप अवघड होतं. मी त्यांना कानशिलात लगावताना खूप सावधगिरी बाळगत होतो.”

हेही वाचा – ‘नवरी मिळे हिटलरला’ आणि ‘पुन्हा कर्तव्य आहे’ नंतर ‘झी मराठी’ लवकरच येतेय ‘ही’ नवी मालिका, पाहा जबरदस्त प्रोमो

संजय लीला भन्साळीची ‘हीरामंडळी’ सीरिज भारतातच नव्हे तर जगभरात मोठ्या प्रमाणात पाहिली जात आहे. या सीरिजने ४३ हून अधिक देशातील ‘नेटफ्लिक्स’च्या टॉप १० ट्रेंडिंग यादीत स्थान निर्माण केलं आहे. भारतातील बोलायचं झालं तर, प्रदर्शित झाल्यानंतर एका आठवड्यात ‘हीरामंडी’ सीरिज ‘नेटफ्लिक्स’वर सर्वाधिक पाहिली गेलेली सीरिज झाली आहे.