बॉलिवूड अभिनेता ईरफान खानच्या निधनातून आजही चाहते पूर्णपणे सावरलेले नाहीत. येत्या २९ एप्रिलला इरफान खानला जाऊन ३ वर्षं झाली. आपल्या दमदार अभिनयाने इरफानने प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर केलं. इरफानचा शेवटचा चित्रपट चित्रपट ‘द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. २८ एप्रिलला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. आता त्यानंतर २ महिन्यांनी हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर प्रदर्शित करण्यात आला आहे.

हेही वाचा- कंगना राणौतच्या ‘चंद्रमुखी २’ चे पहिले पोस्टर प्रदर्शित; ‘या’ दिवशी चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स’ चित्रपटाची कथा राजस्थानच्या जैसलमेरच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. जिथे आदिवासी भागात विंचूच्या डंखांवरील उपचार गाण्यांच्या माध्यमातून केले जाते. या चित्रपटात इरफान खान उंट व्यापारी आदमची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे शूटिंग डिसेंबर २०१५ मध्ये राजस्थानच्या जैसलमेरमध्ये झाले होते.

हेही वाचा- “तू वेडी आहेस का?”, ‘गदर २’मधील सस्पेन्स उघड केल्यामुळे अमीषा पटेल ट्रोल; अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट पाहून नेटकरी संतापले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑगस्ट २०१७ मध्ये, पियाझा ग्रँड येथे लोकार्नो, स्वित्झर्लंड येथील ७० व्या ‘लोकार्नो फिल्म फेस्टिव्हल’मध्ये या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. याशिवाय जगातील सर्व चित्रपट महोत्सवांमध्ये या चित्रपटाचे कौतुक करण्यात आले होते. २०१९ मध्ये हा चित्रपट युरोपमध्ये प्रदर्शित झाला होता.