Most Viewed Movies on OTT : २०२५ हे वर्ष अर्धे सरले आहे. या वर्षी अनेक चित्रपट मोठ्या पडद्यावर आले, पण त्यापैकी काही चित्रपटच हिट ठरले. त्याप्रमाणे बरेच चित्रपट ओटीटीवर रिलीज झाले. ओटीटीवर काही सिनेमांनी चांगलाच धुमाकूळ घातला. अलीकडच्या काळात लोक थिएटरमध्ये जाण्यापेक्षा घरी बसून ओटीटीवर सिनेमे पाहणे पसंत करतात. या वर्षीही डिजिटल प्लॅटफॉर्मवर काही चित्रपटांना कोट्यवधी व्ह्यूज मिळाले. पहिल्या सहा महिन्यात ओटीटीवर सर्वाधिक पाहिलेल्या टॉप ५ चित्रपटांबद्दल जाणून घेणार आहोत.

या वर्षी ओटीटीवर सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या चित्रपटांची यादी समोर आली आहे. टॉप ५ चित्रपटांपैकी ४ नेटफ्लिक्सचे आहेत. ऑरमॅक्सने प्रसिद्ध केलेल्या अर्ध्या वर्षाच्या अहवालानुसार, सैफ अली खान व जयदीप अहलावत यांचा ‘ज्वेल थीफ’ व्ह्यूजच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे.

ज्वेल थीफ

‘ज्वेल थीफ’ हा यंदा ओटीटीवर सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या चित्रपटांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. सैफ अली खानची मुख्य भूमिका असलेला हा एक चोरीवर आधारित अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. सैफ व्यतिरिक्त या चित्रपटात जयदीप अहलावत, कुणाल कपूर आणि निकिता दत्ता यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट २५ एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आणि आतापर्यंत १.३१ कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. पहिल्या आठवड्यातच या चित्रपटाला ७८ लाख व्ह्यूज मिळाले होते.

धूम-धाम

यामी गौतम व प्रतीक गांधी यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. हा एक अ‍ॅक्शन कॉमेडी चित्रपट आहे आणि व्ह्यूजच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. फेब्रुवारी ते जून २०२५ दरम्यान हा चित्रपट १.२१ कोटी वेळा पाहिला गेला आहे आणि पहिल्या आठवड्यात या चित्रपटाला ४१ लाख व्ह्यूज मिळाले होते.

नादानियां

इब्राहिम अली खानचा पहिला चित्रपट ‘नादानियां’ या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या चित्रपटात खुशी कपूर त्याच्याबरोबर मुख्य भूमिकेत होती. इब्राहिम अलीने या सिनेमातून पदार्पण केलं. हा चित्रपट ७ मार्च रोजी प्रदर्शित झाला होता आणि आतापर्यंत त्याला ८९ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. पहिल्या आठवड्यात या चित्रपटाला ३९ लाख व्ह्यूज मिळाले होते.

Mrs.

सान्या मल्होत्राचा हा चित्रपट २०२५ मध्ये ओटीटीवर सर्वाधिक चर्चेत राहिलेला चित्रपट ठरला. काहींना त्याचा विषय आवडला तर काहींना आवडला नाही. काहींनी कौतुक केलं, तर काहींनी टीका केली. पण दोन्ही कारणांमुळे त्याची चर्चा खूप होती. व्ह्यूजच्या बाबतीत हा चित्रपट चौथ्या क्रमांकावर आहे. हा चित्रपट ७ फेब्रुवारी रोजी Zee5 वर प्रदर्शित झाला आणि त्याला एकूण ७३ लाख व्ह्यूज मिळाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टेस्ट

नयनतारा, आर. माधवन आणि सिद्धार्थ यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट ४ एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. हा एक सायकोलॉजिकल ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटाला आतापर्यंत ६५ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. तो व्ह्यूजच्या बाबतीत पाचव्या क्रमांकावर आहे.