प्राइम व्हिडिओवर नुकतीच प्रदर्शित झालेली ‘जुबली’ ही वेबसीरिज सध्या चांगलीच चर्चेत आहे. १९४० ते १९५० या काळातील मुंबईतील चित्रपटसृष्टीचा प्रवास आणि एका मोठ्या फिल्म स्टुडिओची कहाणी या सीरिजमधून उलगाडण्यात आली आहे. प्रेक्षकांनी या सीरिजची खूप प्रशंसा केली आहे. याबरोबरच यातील कलाकारांचंही प्रचंड कौतुक होताना दिसत आहे. यातच एक महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री वामिका गब्बी ही सध्या चर्चेत आहे.

या सीरिजमधील वामिकाच्या कामाचं प्रचंड कौतुक होत आहे. याच संदर्भात एका मुलाखतीदरम्यान वामिकाने चित्रपटसृष्टीतील काळ्या बाजूबद्दल भाष्य केलं आहे. आपल्या मनोरंजनसृष्टीत आजही अभिनेत्रीच्या दिसण्याला प्रचंड महत्त्व आहे असं तिने स्पष्टपणे या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

आणखी वाचा : मुंबईतील आयकॉनिक इरॉस थिएटर खरंच पाडलं? वीर दास, विवेक अग्निहोत्री यांनी व्यक्त केली हळहळ

फ्री प्रेस जर्नलला दिलेल्या मुलाखतीमध्ये वामिक म्हणाली, “आपल्या इंडस्ट्रीमध्ये आजही महिलांच्या सुंदर चेहेऱ्याला प्रचंड महत्त्व आहे. महिलांचे ओठ आणि गाल अगदी परफेक्ट असले पाहिजेत म्हणजे झालं. मी स्वतःला या अशा गोष्टींपासून लांबच ठेवते. या इंडस्ट्रीत लोक सुंदर दिसण्यासाठी काहीही करतात, पण मी मात्र जे परफेक्ट नाहीत अशा लोकांकडे आकर्षित होते. मी जशी आहे तशीच स्वतःवर प्रेम करते.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘जुबली’ वेबसीरिजमध्ये वामिकाने निलूफर हे पात्र साकारलं आहे. या सिरिजमध्ये वामिकासह सिद्धांत गुप्ता, अपारशक्ति खुराना, प्रोसेनजीत चॅटर्जी, अदिती राव हैदरी हे कलाकार मुख्य भूमिकांमध्ये आहेत. वामिका याआधी ‘ग्रहण’ या वेबसीरिजमध्येही दिसली होती. त्यातीलही तिचं काम लोकांना प्रचंड आवडलं होतं.