बॉलीवूडमध्ये काजोलला ९० च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. काजोलने तिच्या ३१ वर्षांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. शाहरुख खान आणि काजोलची जोडी प्रेक्षकांना विशेष भावली. सध्या काजोल तिच्या आगामी ‘द : ट्रायल’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजच्या माध्यमातून काजोलने ओटीटीवर पदार्पण केले आहे.

हेही वाचा : केदार शिंदे यांची वंदना गुप्ते यांच्या वाढदिवसानिमित्त हटके पोस्ट; डॅशिंग फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा

‘द : ट्रायल’ सीरिजमध्ये काजोल वकिलाची भूमिका साकारणार आहे. काजोलने तिच्या ३१ वर्षांच्या करिअरमध्ये आजवर केव्हाच ऑनस्क्रीन किसिंग सीन केला नव्हता. मात्र, पहिल्याच ओटीटी सीरिजमध्ये काजोलने तिचा ‘नो किस पॉलिसी’चा नियम मोडला आहे. अभिनेत्रीच्या ‘द : ट्रायल’मधील बोल्ड सीनची सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. सीरिजमध्ये अभिनेत्री काजोल आणि अभिनेता अली खान यांचे कॉलेजच्या दिवसांमध्ये एकमेकांवर प्रेम असते परंतु, त्यांच्या प्रेमाचे पुढे लग्नात रुपांतर होत नाही असे दाखवण्यात आले आहे. सीरिजमधील काजोलचा लिपलॉक सीन सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर अनेकांनी तिला ट्रोल केले आहे.

हेही वाचा : शाहरुखने भेट म्हणून दिलेल्या लॅपटॉपला आमिर खानने पाच वर्षं हातही लावला नव्हता; अभिनेत्याने सांगितलं कारण

वेब सीरिजमधील किसिंग सीन व्हायरल झाल्यावर अभिनेत्री काजोल ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “मी माझ्या आयुष्यात ‘लोग क्या कहेंगे’ याचा विचार केव्हाच केलेला नाही, समाजातील लोक माझ्याबद्दल काय विचार करतील याचा मला फरक पडत नाही. कारण, माझ्या आईने खूप खंबीरपणे मला वाढवले आहे. तिने स्वत: कधीच समाज काय बोलेल याचा विचार केला नाही. खरेतर माझी आजी, आई यांनी नेहमी मला हिच शिकवण दिली की, तुझे आयुष्य ही पूर्णपणे तुझी जबाबदारी आहे. तुमच्या आयुष्याबाबत इतर कोणाचे काय मत आहे हे अजिबात महत्त्वाचे नसते.”

हेही वाचा : नाटय़रंग : ‘नियम व अटी लागू’ ; परस्पर समज-गैरसमजांचं हास्यस्फोटक रसायन

काजोल पुढे म्हणाली, “आपल्या आयुष्याची जबाबदारी आपण स्वत: घेतली पाहिजे. माझ्या आजी-आजोबांनी कायम हिच शिकवण मला दिली. तसेच माझी आई सुद्धा आज स्वत:च्या इच्छेप्रमाणे आयुष्य जगत आहे. मी सुद्धा त्यांच्यासारखे जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे, तुम्ही काय करायचे हे ठरवण्याचा हक्क समाजाला नसतो हे कायम लक्षात ठेवले पाहिजे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, काजोलने ‘द : ट्रायल’ सीरिजमध्ये केलेल्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. यामध्ये काजोलसह जिशू सेनगुप्ता, कुबरा सैत, शीबा चड्ढा, अली खान, गौरव पांडे, विजय विक्रम सिंह यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.