Kantara Chapter 1 OTT Release : कांतारा चॅप्टर १ ची सध्या खूप चर्चा सुरू आहे. ऋषभ शेट्टीची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने थिएटरमध्ये धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. त्याचबरोबर ऋषभ शेट्टीच्या अभिनयाचं, चित्रपटाच्या कथेचं देखील खूप कौतुक होत आहे.
कांतारा चॅप्टर जगभरात दमदार कमाई करत आहे. मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहिल्यानंतरही, लोक ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्याच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या यशानंतर, हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर येण्यास सज्ज झाला आहे.
ऋषभ शेट्टीचे चाहते कांतारा चॅप्टर १ च्या ओटीटी रिलीजची खूप आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यापासून, लोकांनी त्याच्या ओटीटी रिलीजबद्दल अंदाज लावण्यास सुरुवात केली होती. आता ओटीटी प्लॅटफॉर्मच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची तारीख जाहीर करण्यात आली आहे. तुम्ही हा बहुचर्चित कांतारा चॅप्टर १ चित्रपट कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहू शकता, ते जाणून घेऊयात.
तुम्ही थिएटरमध्ये ‘कांतारा चॅप्टर १’ चा जादुई अनुभव घेतला नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. आता तुम्ही हा चित्रपट तुमच्या घरी ओटीटीवर पाहू शकाल. ऋषभ शेट्टी दिग्दर्शित ‘कांतारा चॅप्टर १’ हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. प्राइम व्हिडीओने १९ सेकंदांच्या प्रोमोसह कांतारा चॅप्टर १ ची ओटीटी रिलीज डेट जाहीर केली आहे.
पाहा पोस्ट
ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा चॅप्टर १’ हा चित्रपट ३१ ऑक्टोबर रोजी अमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. तुम्ही हा सिनेमा थिएटरमध्ये पाहिला नसेल तर तो तुम्हाला या शुक्रवारपासून अमेझॉन प्राइम व्हिडीओवर घरबसल्या पाहता येईल. “कांताराचा थरार पाहायला तयार राहा, कारण हा चित्रपट ३१ ऑक्टोबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर येतोय,” असं या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
‘कांतारा चॅप्टर १’ च्या कमाईबद्दल बोलायचं झाल्यास, २५ दिवसांत या चित्रपटाने जगभरात ७८० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने भारतात बॉक्स ऑफिसवर अंदाजे ६६७ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाला अजूनही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय, ते पाहता त्याचे लाइफटाइम कलेक्शन किती असेल, याकडे लक्ष लागले आहे.
