भारतातील सर्वात कठीण परीक्षा म्हंटली की आयआयटीच्या परीक्षेचं नाव पहिलं येतं, पण तरीही, देशभरातील लाखो विद्यार्थी अथक मेहनत करत परीक्षेची तयारी करुन आपले हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांची मेहनत आणि त्यांना येणाऱ्या अडचणी याची गोष्ट सांगणारी वेब सीरिज म्हणजे ‘कोटा फॅक्टरी’. द व्हायरल फीवर (टीव्हीएफ) या यूट्यूब चॅनेलवरच्या या सीरिजला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले.

‘कोटा फॅक्टरी’ ही कथा आयआयटीची तयारी करणारे विद्यार्थी, कोचिंग सेंटर इंडस्ट्री आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्यात घडणारे बदल याभोवती फिरते. या सीरिजला एवढी लोकप्रियता मिळाली की याचा पुढील सीझन हा थेट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला. या दुसऱ्या सीझनलाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. दुसऱ्या सीझनमध्ये या विद्यार्थ्यांच्या प्रवासातील आणखी वेगळ्या गोष्टी लोकांच्या समोर आल्या. आता याच्या तिसऱ्या सीझनची सगळेच आतुरतेने वाट बघत आहेत.

आणखी वाचा : रणबीर-श्रद्धाच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई; अवघ्या काही दिवसांत १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री

नुकतंच नेटफ्लिक्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून कोटा फॅक्टरीच्या तिसऱ्या सीझनची घोषणा केली आहे. ‘जीतू भैय्या’ हे सगळ्यांचं लाडकं पात्र आणि त्यातील इतर मुख्य पात्रांची छोटीशी झलक आपल्याला पाहायला मिळत आहे, शिवाय आयआयटीच्या रिजल्टबद्दल या व्हिडिओमध्ये आपल्या कानावर पडत आहे. लवकरच ‘कोटा फॅक्टरी’चा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Netflix India (@netflix_in)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या नव्या सीझनची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही, पण लवकरच हा नवा सीझन प्रदर्शित होणार असल्याचं या व्हिडिओमध्ये म्हंटलं आहे. ‘कोटा फॅक्टरी’ मध्ये मयूर मोरे, जितेंद्र कुमार, अहसान चन्ना आणि इतरही कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘कोटा फॅक्टरी’ या टीव्हीएफ ओरिजनल सीरिजचे दिग्दर्शन राघव सुब्बू यांनी केले असून या सीरिजचे दोनही सिझन तुम्हाला पाहता येणार आहेत. नेटकरी आणि टीव्हीएफचे चाहते या सीरिजची आतुरतेने वाट बघत आहेत.