अभिनेत्री काजोल सध्या तिच्या ‘लस्ट स्टोरीज २’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. ‘लस्ट स्टोरीज २’ हा चित्रपट २९ जून २०२३ रोजी नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच निमित्ताने काजोलने अलीकडेच एका मुलाखतीला हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्रीने ९० च्या दशकातील प्रेम आणि अलीकडच्या प्रेमामधील फरक याबाबत खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : ‘लस्ट स्टोरीज २’मध्ये आजीची भूमिका का निवडली? नीना गुप्ता कारण सांगत म्हणाल्या, “नव्या पिढीशी लैंगिक संबंधांबद्दल…”

काजोल-शाहरुखच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या १९९५ रोजी प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील प्रेम आणि काजोलच्या आगामी ‘लस्ट स्टोरीज २’ मध्ये दाखवण्यात आलेले प्रेमसंबंध यात खूप फरक आहे. ‘लस्ट स्टोरीज २’ हा चित्रपट आधुनिक नातेसंबंधांवर आधारित आहे.

हेही वाचा : “देवभूमीला मृत घोड्यांचे स्मशान…” केदारनाथमधील ‘त्या’ गंभीर समस्येची प्रसिद्ध अभिनेत्रीकडून दखल, शेअर केला व्हिडीओ

दोन्ही काळातील प्रेमाविषयी सांगताना पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत काजोल म्हणाली, “अलीकडच्या काळात प्रेमाची व्याख्या पूर्णपणे बदलली आहे. हा बदल आता चित्रपटांमध्येही दाखवला जात आहे. पूर्वी आपल्या प्रेयसीला पत्र लिहिणे, संदेश पाठवणे किंवा संबंधित व्यक्तीच्या घरासमोर उभे राहणे अशा गोष्टी प्रेमात पडलेले लोक करायचे परंतु, आता या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत नाहीत. १९९० च्या दशकात प्रेमाकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा होता आता एखाद्या व्यक्तीच्या सारखं मागे लागणे म्हणजे मूर्खपणा समजला जातो.”

हेही वाचा : Video : “जीजू कैसे हैं?” पापाराझींचा प्रश्न ऐकून कियारा अडवाणी काहिशी लाजली अन् म्हणाली…

दरम्यान, ‘लस्ट स्टोरीज २’ बद्दल सांगायचे झाले तर हा चित्रपट २९ जूनला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असून, यामध्ये काजोलशिवाय नीना गुप्ता, तमन्ना भाटिया, तिलोत्तमा शोम, अमृता सुभाष, अंगद बेदी, कुमुद मिश्रा, मृणाल ठाकूर आणि विजय वर्मा यांसारख्या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lust stories 2 actress kajol talks about difference between two generation love language sva 00
First published on: 24-06-2023 at 11:02 IST