काहींना थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहायला आवडतं, तर काही जण घरी बसून ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपटाचा आनंद घेतात. दर आठवड्याला सिनेमागृहांमध्ये व ओटीटीवर नवनवीन चित्रपट रिलीज होतात. एखाद्या चित्रपटाचा रिव्ह्यू चांगला असेल तर तो थिएटरमध्ये पाहावा, अशी काही जणांची इच्छा असते पण ते शक्य होत नाही. नंतर तो चित्रपट ओटीटीवर यायची वाट पाहावी लागते.
ओटीटीवर जगभरातील वेगवेगळ्या शैलीचे, विविध भाषेतील चित्रपट उपलब्ध असतात. जर एखाद्याला अॅक्शन-थ्रिलर पाहायला आवडत असतील, तर नेमका कोणता चित्रपट चांगला याबद्दल गोंधळ असतो. जर तुम्हीही आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर काहीतरी चांगलं पाहायचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला अशा चित्रपटाबद्दल सांगतो ज्याचा सस्पेन्स तुम्हाला खूप आवडेल. इतकंच नाही तर त्याचा क्लायमॅक्स तुम्हाला संपूर्ण चित्रपट पाहण्यास भाग पाडेल. कोणता आहे हा चित्रपट?
चित्रपटाचे नाव काय?
या चित्रपटाचे नाव ‘मार्गन’ आहे. या चित्रपटात कोणते कलाकार आहेत? चित्रपटाची कथा काय आहे, आपण हा चित्रपट कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर कुठे पाहू शकतो आणि IMDb वर याला किती रेटिंग मिळाले आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात.
‘मार्गन’ या २ तास ११ मिनिटांच्या या चित्रपटात विजय अँटनी, अर्चना आणि दीपशिखा मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट या वर्षी प्रदर्शित झाला होता. याचे दिग्दर्शन लिओ जॉन पॉल यांनी केले होते. हा एक तमिळ अॅक्शन थ्रिलर आहे. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळालं.
‘मार्गन’ चित्रपटाची कथा काय?
‘मार्गन’ चित्रपटात मुंबई पोलीस कॉन्स्टेबल ध्रुवची आहे. या चित्रपटातील सिरीयल किलर तिथल्या मुलींना लक्ष्य करतो. तो खूप विचित्र पद्धतीने मुलींना मारतो. मुली ज्याप्रमाणे मरतात, ते खूपच धोकादायक आहे. कथेची सुरुवात एका पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीच्या खून प्रकरणापासून होते. पुढे काय होते, ध्रुव त्या सिरीयल किलरला पकडू शकतो की नाही आणि ते पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.
कुठे पाहायचा मार्गन चित्रपट?
हा सस्पेन्स थ्रिलर ‘मार्गन’ चित्रपट तुम्ही घरबसल्या पाहू शकता. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे. ‘मार्गन’ला आयएमडीबीवर ६.८ रेटिंग मिळाले आहे.