Netflix Crime Adult Series: विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर जगभरातील कंटेंट पाहता येतो. नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ, जिओ हॉटस्टार हे भारतातील काही लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म्स आहेत. क्राइम, ड्रामा, थ्रिलर, कौटुंबीक असे विविध प्रकारचे चित्रपट व सीरिज तुम्हाला या प्लॅटॉर्म्सवर पाहता येतात. आज आम्ही तुम्हाला अशा ५ सीरिजबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही कुटुंबाबरोबर पाहू शकत नाही.
या सीरिजचे कथानक तर दमदार आहेच, पण यात बोल्ड दृश्यांचा भडीमार आहे. इंटिमेट व बोल्ड सीन असलेल्या या सीरिजला प्रचंड लोकप्रियता मिळाली. काही सीरिजचे तर २ सीझन आले आहेत. कोणत्या आहेत या सीरिज, पाहुयात यादी.
लस्ट स्टोरीज
या यादीतील पहिलं नाव म्हणजे ‘लस्ट स्टोरीज’. या सिनेमाचे आतापर्यंत २ भाग आले आहेत. ‘लस्ट स्टोरीज 2’ २०२३ मध्ये नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. या सिनेमात ४ वेगवेगळ्या कथा दाखवण्यात आल्या आहेत. ‘लस्ट स्टोरीज’ मध्ये गुंतागुंतीची नाती दाखवण्यात आली आहेत. तसेच यात बोल्ड दृश्यांचा भडीमार आहे. ‘लस्ट स्टोरीज’ हिट झाल्यानंतर ‘लस्ट स्टोरीज 2’ लाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.
सेक्रेड गेम्स
‘सेक्रेड गेम’ या सीरिजचे दोन भाग आले. या क्राइम ड्रामा सीरिजला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. अनुराग कश्यप दिग्दर्शित या चित्रपटात प्रचंड बोल्ड दृश्ये आहेत. तसेच नवाजुद्दीन सिद्दिकीचे इंटिमेट सीन व शिवीगाळही आहे. ‘सेक्रेड गेम 2’ मध्ये सैफ अली खान, नवाजुद्दी सिद्दिकी, पंकज त्रिपाठी आहेत. दुसऱ्या भागातही अश्लील कंटेंट आहे. ही सीरिज तुम्ही कुटुंबाबरोबर पाहू शकत नाही.
सीए टॉपर
‘सीए टॉपर’ हे नाव वाचल्यावर तुम्हाला ही कदाचित शिक्षणाशी संबंधित सीरिज वाटेल, पण असं नाही. या सीरिजमध्येही बोल्ड दृश्यांचा भडीमार आहे. एक सीए पास व्यक्ती देहव्यापार करू लागतो, त्याची कथा सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. यामध्ये मानव कौल, तिलोत्तमा शोमसह अनेक कलाकार आहेत.
ये काली काली आंखें
‘ये काली काली आंखें’ देखील क्राइम थ्रिलर सीरिज आहे. यात श्वेता त्रिपाठी व ताहिर राज भसीन यांनी मुख्य भूमिका केल्या आहेत. या सीरिजमध्येही खूप इंटिमेट सीन आहे, तसेच शिव्यांचा भडीमार आहे. ही सीरिज तुम्ही कुटुंबाबरोबर पाहू शकत नाही.
टूथ परी व्हेन लव बाइट्स
‘टूथ परी व्हेन लव बाइट्स’ ही एक हॉरर रोमँटिक सीरिज आहे. २०२३ मध्ये आलेल्या या सीरिजमध्ये भीतीदायक दृश्ये तर आहेच, त्याचबरोबर अडल्ट कंटेंटही आहे. या सीरिजमध्ये शांतनू महेश्वरी, तान्या मनिकलता, तिलोत्मा शोम या कलाकारांनी काम केलं आहे.