Netflix Web Series to Watch with Family: ओटीटीवर कुटुंबाबरोबर बसून पाहता येईल अशा सीरिज किंवा चित्रपट आहेत का? असा विचार तुम्ही करत असाल तर याचं उत्तर हो असं आहे. नेटफ्लिक्सवर जगभरातील विविध जॉनरच्या कलाकृती पाहायला मिळतात. त्यात बोल्ड कंटेंटचं प्रमाण जास्त आहे. पण याच नेटफ्लिक्सवर अशा काही सीरिज आहेत ज्या तुम्ही कुटुंबाबरोबर पाहू शकता.
आज आम्ही तुम्हाला ज्या सीरिजबद्दल सांगतोय त्यात बोल्ड कंटेंट नाही, अश्लील भाषा, मारहाणही नाही. या शोमध्ये साधेपणा, कुटुंबातील नाती व भावना उत्तम पद्धतीने दाखवल्या आहेत. या सीरिज फक्त तरुणाईलाच नाही तर मोठ्यांनाही नक्की आवडतील. नेटफ्लिक्सवरील पाच फॅमिली फ्रेंडली वेब सीरिजबद्दल जाणून घेऊयात.
ताजमहल 1989
या रोमान्स, ड्रामा सीरिजमध्ये प्रेम, नातेसंबंध आणि त्याची व्हॅल्यू दाखवण्यात आली आहे. ही सीरिज तुम्ही कुटुंबासोबत पाहू शकता. यात नीरज काबी, गीतांजली कुलकर्णी, शीबा चड्ढा व दानिश हुसेन हे कलाकार आहेत. या सीरिजमध्ये १९८९ मधील लखनऊ शहर दाखवण्यात आले आहे. यात प्रेमाचे विविध पैलू दाखवले आहेत. ही सीरिज २०२० मध्ये नेटफ्लिक्सवर आली होती. तिला IMDb वर ७.४ रेटिंग मिळाले आहे.
मामला लीगल है
रवी किशनचा उत्तम अभिनय असलेली ही विनोदी सीरिज आहे. आयएमडीबीवर ८ रेटिंग असलेल्या या सीरिजचे दिग्दर्शन राहुल पांडेने केले आहे. यात अनंत व्ही जोशी, निधी बिष्ट, नैला ग्रेवाल, तन्वी आझमी व यशपाल शर्मा हे कलाकार आहेत. २०२४ मध्ये आलेल्या या सीरिजने नेटफ्लिक्सवर धुमाकूळ घातला होता. ८ एपिसोडच्या या सीरिजचं यश पाहता लवकरच तिचा दुसरा सीझन येण्याची शक्यता आहे.
सिलेक्शन डे
नेटफ्लिक्सच्या सर्वात यशस्वी सीरिजपैकी एक ‘सिलेक्शन डे’ आहे. ही सीरिज तुम्ही कुटुंबाबरोबर पाहू शकता. आयएमडीबीवर ७.३ रेटिंग असलेली ही सीरिज २०१८ मध्ये आली होती. यात राजेश तैलांग, करवीर मल्होत्रा, महेश मांजरेकर व रत्ना पाठक हे कलाकार होते. ही सीरिज पालकांकडून अप्रत्यक्षपणे असलेला दबाव, स्वप्ने व भविष्यावर आधारित आहे.
माई
हा एक भावनिक थ्रिलर चित्रपट आहे. अंशई लाल दिग्दर्शित या सीरिजमध्ये मुख्य भूमिका साक्षी तंवरची आहे. यात वामिका गब्बी, प्रश्नात नारायण, रायमा सेन व वैभव राज हे कलाकार आहेत. आयएमडीबीवर ७ रेटिंग मिळालेली ही सीरिज तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
कोटा फॅक्ट्री
तुम्ही ‘पंचायत’चे चाहते असाल तर तुम्हाला ‘कोटा फॅक्ट्री’ नक्की आवडेल. कोचिंग सेंटर व तिथे अभ्यास करणाऱ्या मुलांवर बेतलेली ही सीरिज आहे. यात पंचायत फेम अभिनेता जितेंद्र कुमार मुख्य भूमिकेत आहे.
टीव्हीएफच्या या सीरिजमध्ये मयूर मोरे, जितेंद्र कुमार, रंजन राय, आलम खान, एहसास चन्ना हे कलाकार होते. या सीरिजचे आतापर्यंत तीन सीझन आले आहेत. या सीरिजला आयएमडीबीवर ८ रेटिंग मिळाले आहे.