१७ जूनपासून ‘बिग बॉस ओटीटी २’ला सुरुवात झाली. पहिल्याच आठवड्यात बिग बॉसच्या घरात अनेक खुलासे होताना दिसत आहेत. घरातील स्पर्धक त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल इतर स्पर्धकांशी चर्चा करताना दिसत आहेत. अभिनेत्री पूजा भट्टदेखील ‘बिग बॉस ओटीटी २’मध्ये सहभागी झाली आहे. यामध्ये तिने तिच्या लग्नाबाबत खुलासा केला आहे.

कोकणातील गावी पोहोचला भाऊ कदम, कौलारू घरातील लाकडी फळीवर लिहिलेली ‘ती’ दोन वाक्ये चर्चेत

पूजा भट्ट तिच्या मोडलेल्या लग्नाबद्दल बेबिका धुर्वेशी बोलताना दिसली. पूजाने तिचा पूर्व पती मनीष माखिजापासून वेगळे होण्याचा निर्णय का घेतला याबद्दलही तिने सांगितलं. बेबिकाने पूजाला तिचं लग्न झालं आहे का? असा प्रश्न विचारला. त्यावर पूजा म्हणाली, “माझ्या लग्नाला जवळपास ११ वर्षे झाली होती. लग्नात काहीच चांगलं नाही, मग खोटं बोलून का जगायचं? असा विचार आम्ही केला. ही ड्रेस रिहर्सल नव्हती, आपल्याला फक्त एकच संधी मिळते.” बेबिका पूजाला विचारते की तिचा पूर्व पती अभिनेता होता का? या प्रश्नाचं उत्तर देताना पूजा म्हणते, “तो अभिनेता नव्हता, पण तो मीडिया व्यवसायाशी संबंधित होता आणि तो एक चांगला माणूस आहे.”

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींनी दिली मुलांच्या कामांबद्दल माहिती, म्हणाले, “पार्थेशने दोन वर्षे…”

पूजा पुढे म्हणाली, “त्यावेळी माझे मन जागेवर नव्हते. त्याला मुलं हवी होती, तेव्हा मला मुलं जन्माला घालायची नव्हती. पण आता मला मुलं आवडतात. जेव्हा आपण खोटं बोलतो तेव्हा आरोप-प्रत्यारोपांचा खेळ सुरू होतो आणि मला ते नको होतं. जे काही होतं ते चांगलं होतं. आम्ही एकमेकांचा आदर ठेवला आणि वेगळे झालो.”

View this post on Instagram

A post shared by Pooja B (@poojab1972)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पूजा भट्टने मनीष माखिजाबरोबर लग्न केलं होतं. त्यांचा प्रेमविवाह होता. भारतीय व्हीजे आणि मुंबईतील रेस्टॉरंट मालक असलेला मनीष व पूजा पहिल्या भेटीनंतर चांगले मित्र झाले. लवकरच ते प्रेमात पडले आणि फक्त दोन महिने डेट केल्यानंतर त्यांनी २००३ मध्ये लग्नगाठ बांधली होती. पण, लग्नाच्या ११ वर्षानंतर दोघेही २०१४ मध्ये विभक्त झाले.