या वीकेंडला ओटीटीवर काय पाहायचं असा तुम्ही विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला एका खास चित्रपटाबद्दल सांगणार आहोत. हा चित्रपट २६ वर्षांपूर्वी आला होता. या चित्रपटाने त्याकाळी बॉक्स ऑफिस गाजवलं होतं. चित्रपटाचं शूटिंग फक्त ८ दिवस चाललं होतं आणि त्याचं बजेट केवळ ४९ लाख रुपये होतं. हा चित्रपट ओटीटीवर उपलब्ध आहे.
तुम्ही आतापर्यंत अनेक बॉलीवूड आणि हॉलीवूड हॉरर चित्रपट पाहिले असतील. काही हॉरर चित्रपट असे आहेत, जे एकटं पाहण्याची भीती वाटते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका हॉलीवूड चित्रपटाबद्दल सांगणार आहोत. हा चित्रपटाने २६ वर्षांपूर्वी रेकॉर्डब्रेक कमाई केली होती.
आम्ही ज्या हॉरर चित्रपटाबद्दल बोलतोय त्याचे नाव द ब्लेअर विच प्रोजेक्ट असे आहेत. हा चित्रपट १९९९ मध्ये प्रदर्शित झाला होता. द ब्लेअर विच प्रोजेक्ट (The Blair Witch Project on OTT) हा १९९९ चा अमेरिकन हॉरर चित्रपट आहे, जो डॅनियल मायरिक आणि एडुआर्डो सांचेझ यांनी संयुक्तपणे दिग्दर्शित केला होता.
द ब्लेअर विच प्रोजेक्ट (The Blair Witch Project) हा पॅरानॉर्मल अॅक्टिव्हिटीवर बेतलेला चित्रपट आहे. हा चित्रपट एका तीन तरुणांची कथा आहे. हे तिघेही एका प्रोजेक्टसाठी जातात, पण विचित्र पद्धतीने बेपत्ता होतात. एका वर्षानंतर या तिघांचा एक कॅमेरा सापडतो, तेव्हा त्यांच्याबरोबर काय घडलं ते फुटेजमधून कळतं. या चित्रपटात हीदर डोनाह्यू, मायकेल विल्यम्स आणि जोशुआ लिओनार्ड मुख्य भूमिकेत होते.
द ब्लेअर विच प्रॉजेक्टचे बजेट व कलेक्शन
तुम्हाला आश्चर्य वाटेल की फक्त ४९ लाख रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने जगभरात २४५ मिलियन डॉलर्सची कमाई केली होती. जर तुम्ही हा चित्रपट अजून पाहिला नसेल, तर तुम्ही या वीकेंडला तुमच्या कुटुंबाबरोबर तो पाहू शकता. द ब्लेअर विच प्रॉजेक्ट तुम्हाला अमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.