तुमच्याकडे प्राइम व्हिडीओचे सबस्क्रिप्शन असेल व तुम्हाला सीरिज पाहायला आवडत असतील तर तुम्हाला या प्लॅटफॉर्मवरील ट्रेंडिंग सीरिजबद्दल माहित असायलाच हवं. भारतात प्राइम व्हिडीओवर ट्रेंडिंग असलेल्या टॉप 10 वेब सीरिजबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या यादीत पहिल्या क्रमांकावर एक हॉरर सीरिज आहे.
अंधेरा
ट्रेंडिंग सीरिजच्या यादीत पहिल्या क्रमांकावर ‘अंधेरा’ आहे. प्राइम व्हिडीओवरील नवीन सुपरनॅचरल हॉरर सीरिज ‘अंधेरा’चे एकूण आठ भाग आहेत. ही सीरिज १४ ऑगस्ट रोजी प्राइम व्हिडीओवर रिलीज झाली. ‘अंधेरा’मध्ये प्रिया बापट, करणवीर मल्होत्रा, प्राजक्ता कोळी आणि सुरवीन चावला प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. तसेच वत्सल सेठ, पर्वीन डबास आणि प्रणय पचौरी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सीरिजला आयएमडीबीवर ६.८ रेटिंग मिळाले आहे.
अरेबिया कदाली
यादीत दुसऱ्या क्रमांकावर तमिळ सीरिज अरेबिया कदाली आहे. या सर्व्हायवल ड्रामा सीरिजला आयएमडीबीवर ६.५ रेटिंग मिळाले आहे.
द समर आय टर्न्ड प्रिटी
यादीत तिसऱ्या क्रमांकावर अमेरिकन रोमँटिक ड्रामा मालिका ‘द समर आय टर्न्ड प्रिटी’ आहे. या मालिकेचे एकूण तीन सीझन आहेत. या सीरिजला आयएमडीबीवर ७.३ रेटिंग मिळाले आहे.
बटरफ्लाय
या यादीत चौथ्या क्रमांकावर अमेरिकन सीरिज बटफ्लाय आहे. या सीरिजला आयएमडीबीवर ६.८ रेटिंग मिळाले आहे.
पंचायत
पंचायत ही प्राइम व्हिडीओवरील सर्वात लोकप्रिय सीरिज आहे. जितेंद्र कुमार, सान्विका, नीना गुप्ता, फैसल मलिक यांच्या भूमिका असलेल्या या सीरिजला आयएमडीबीवर ९ रेटिंग मिळाले आहे.
रंगीन
प्राइम व्हिडीओवर सहाव्या क्रमांकावर विनीत कुमार सिंहची रंगीन वेब सीरिज ट्रेंड करत आहे. या सीरिजला आयएमडीबीवर ६.१ रेटिंग मिळाले आहे.
डेक्सटर रिझरेक्शन
अमेरिकन क्राईम ड्रामा मिस्ट्री सीरिज डेक्सटर रिझरेक्शन या यादीत ७ व्या क्रमांकावर आहे. सीरिजचे रेटिंग ९.२ आहे.
हेड ओव्हर हील्स
प्राइम व्हिडीओवरील ट्रेंडिंग सीरिजच्या यादीत आठव्या क्रमांकावर हेड ओव्हर हील्स ही सीरिज आहे. या सीरिजला आयएमडीबीवर ७.८ रेटिंग मिळाले आहे.
काउंट डाऊन
या यादीत नवव्या क्रमांकावर अमेरिकन क्राइम ड्रामा सीरिज काउंट डाऊन आहे. या सीरिजला आएमडीबीवर ६.८ रेटिंग मिळाले आहे.
मिर्झापूर
प्राइम व्हिडीओवर अनेक जुन्या सीरिज ट्रेंड करत आहेत. यापैकीच एक म्हणजे प्राइम व्हिडीओची ओरिजनल सीरिज मिर्झापूर. आयएमडीबीवर ८.४ रेटिंग असलेली ही सीरिज १० व्या क्रमांकावर ट्रेंडिंग आहे.