मराठमोळी प्रिया बापट आता एका हिंदी शोमध्ये झळकणार आहे. तिच्याबरोबर ओटीटीवर अनेक सुपरहिट सीरिजमध्ये काम करणारा अभिनेता बरुण सोबती महत्त्वाच्या भूमिकेत आहे. इतकंच नाही तर तिसऱ्या महत्त्वाच्या भूमिके ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ सिनेमात रणवीरच्या बहिणीचं पात्र साकारणारी अंजली आनंद असेल. या शोच्या शुटिंगला सुरुवात झाली आहे.

सोनी लिव्‍हने त्‍यांचा आगामी शो ‘रात जवान है’ च्‍या शूटिंगची घोषणा केली आहे. या शोमध्‍ये बरूण सोबती, अंजली आनंद व प्रिया बापट यांसारखे प्रतिभावान कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. यामिनी पिक्‍चर्स प्रायव्‍हेट लि‍मिटेड निर्मित आणि प्रतिभावान सुमीत व्‍यासचे दिग्‍दर्शन असलेली सीरिज प्रेक्षकांना मैत्री, पालकत्‍व या गोष्टींसह आधुनिक जीवनातील आव्‍हानांच्‍या नवीन पैलूंचा अनुभव देईल. या शोमध्‍ये विनोद, ड्रामा व मनाला स्पर्शून जाणारे भावनिक क्षणही पाहायला मिळतील.

प्रियांका चोप्राची बहीण झाली केजरीवालांची सून! मीराने ४० व्या वर्षी बांधली लग्नगाठ, फोटो शेअर करत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘रात जवान है’ चे दिग्‍दर्शन करण्‍याबाबत सुमित व्यासने आपला आनंद व्यक्त केला. ”पालकत्वाची जबाबदारी अंगावर पडली की तारूण्‍य संपले असा जगातील सर्वांचा समज आहे. ‘रात जवान है’ हा समज मोडून काढण्याचे काम करते. ही तीन मित्रांची कथा आहे, जे मुलं झाल्‍यानंतर देखील त्‍यांच्‍यामधील मैत्री कायम ठेवण्‍यासाठी सर्वोतोपरी प्रयत्‍न करतात. आम्‍ही सेटवर खूप धमाल करत आहोत, तसेच बरूण, अंजली व प्रिया तिघांसोबत काम करताना खूप धमाल वाटतेय. त्यांच्यामुळे सेटवर नेहमी उत्‍साही वातावरण असते,” असं सुमित व्यास म्हणाला.